Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, फेब्रुवारी ०३, २०२१

शरजील उस्मानी विरुद्ध कठोर कारवाई करा - विश्व हिंदू परिषदेची मागणी



नागपूर, ३ फेब्रुवारी-   
पुण्यात ३० जानेवारी रोजी आयोजित एल्गार परिषदेत हिंदुं विषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारा अलीगड मुस्लीम विद्यापीठाचा नेता शरजील उस्मानी विरुद्ध महाराष्ट्र सरकारने कठोर कारवाई करण्याची मागणी विश्व हिंदू परिषदेचे विदर्भ प्रांत मंत्री गोविंद शेंडे यांनी केली आहे , या बाबत विहिंप ने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे तसेच बजरंग दल तर्फे गणेशपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
आजचा हिंदू समाज सडलेला, मुस्लिमांना मारण्यासाठी त्यांना काहीच कारण लागत नाही. एखादी व्यक्ती मुस्लीम आहे हे कारण पुरेसे आहे, असे आक्षेपार्ह वक्तव्य शरजील ने केले आहे.
हे विधान महाराष्ट्रातील धार्मिक सौहार्द बिघडवण्याच्या उद्देशाने केले असून, उगाच भडकाऊ भाषण देऊन सवंग प्रसिद्धी मिळवण्याच्या अनेक घटना सध्या होत आहेत आणि हेतुपुरस्सर हिंदु समाजाला यात ओढले जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात असला प्रकार मुळीच खपवल्या जाणार नाही.एक माथेफिरू युवक राज्यात येतो, हिंदुत्वावर शिंतोडे उडवतो आणि निघून जातो. आणि त्यावर काहीच कारवाई होत नाही. हा प्रकार आश्चर्यचकित करणारा आहे. एल्गार परिषदेच्या माध्यमातून तुकडे तुकडे गॅंग महाराष्ट्रात सक्रीय होत आहे, असल्या अयोजनांना परवागी देणे चूक आहे. या वर महाराष्ट्र सरकारने त्वरीत कठोर कारवाई करावी अन्यथा विश्व हिंदू परिषद, बजरंग दल तर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल.
यावेळी बजरंग दल नागपूर महानगर संयोजक विशाल पुंज,बंडू मुंजे, महानगर गोरक्षा प्रमुख भोजराज नवरे, दक्षिण नागपूर बजरंग दल संयोजक प्रशांत मिश्रा, पश्चिम नागपूर संयोजक ऋषभ अरखेल, मध्य नागपूर संयोजक सुशील चौरसिया, अभिषेक गुप्ता,निखिल गौर इत्यादी कार्यकर्ता प्रामुख्याने उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.