Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, जानेवारी १९, २०२१

पतीदेव विजयी होताच बायकोने पतीदेवांना खांद्यावर घेवून मिरवणूक काढली

पतीदेव विजयी होताच बायकोने पतीदेवांना खांद्यावर घेवून मिरवणूक काढली


जुन्नर /आनंद कांबळे
ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत पतीदेव विजयी होताच बायकोने पतीदेवांना खांद्यावर घेवून मिरवणूक काढली.
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पाळू ग्रामपंचायतीमधील ही घटना आहे.
पुण्यात या घटनेचा अपवाद ठरणारी गोष्ट ठरली आहे. निवडणूक जिंकलेल्या नवऱ्याला चक्क खाद्यांवर उचलून बायकोनेच मिरवले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाचा व्हायरल होत आहे.



ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकालाकडे गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्वांचे लक्ष वेधले होते. निकालानंतर विजयाची मिरवणूक आणि जल्लोषाचा गुलाल उधळायला सर्वचजण सज्ज होते. मात्र, कोरोनामुळे मिरवणुकीला बंदी घालण्यात आली होती. मात्र, पुणे जिल्ह्यातील एका ग्रामपंचायत निवडणुकीत पती निवडून आल्यानंतर पत्नीने चक्क खांद्यावर उचलून पतीची मिरवणूक काढली.  

पुण्यातील पाळू ग्रामपंचायतीतील एका उमेदवाराच्या विजयाची मिरवणूक लक्षवेधी ठरली. कारण, येथे कार्यकर्त्यांऐवजी चक्क पत्नीनेच पतीला खांद्यावर उचलून घेतले होते. गावातील जाखमाता ग्रामविकास परिवर्तन पॅनलचा दारुण पराभव करत जाखमातादेवी ग्रामविकास पॅनलने ७ पैकी ६ जागावर वर्चस्व मिळवले. या घवघवीत यशामागे महिलांचा मोलाचा वाटा होता. त्यामुळे विजयाचा जल्लोष करत असताना गावातील विजयी उमेदवाराच्या पत्नीने आपल्या पतीच्या विजयायाचा हटके जल्लोष केला. पती संतोष यांना खांद्यावर उचलून पत्नी रेणुकाने गावात आनंदाने मिरवणूक काढली. पाळू ग्रामपंचायतीमध्ये संतोष शंकर गुरव यांनी २२१ मतं मिळवत विरोधी उमेदवाराला पराभूत केले. या उत्साही पती-पत्नीचे फोटो गावात आणि सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.