किसान सभेच्या सातत्यपुर्ण पाठपुराव्यामुळे, लोकांच्या हाताला मिळाले काम!
जुन्नर /आनंद कांबळे
आंबेगाव तालुक्यातील सावरली गावात रोजगार हमीचे काम सुरू झाले आहे,
जिल्हापरिषदने तयार केलेल्या रस्त्याचे गटार खोदने, व मुरूम रस्त्यावर पसरवणे हे काम सुरू आहे.
या नंतर या मुरूमावरून रोलर पण फिरवला जाऊन, रस्ता मजबूत केला जाणार आहे,
किमान महिनाभर मजुरांना काम मिळेल. येवढं आहे रस्त्याचे काम.
रोजगार हमीच्या कामावर १६ ते १८ मजूर असतात कामावर,
गावच्या रस्त्याचे काम मजबूत होऊन विकासाला हातभार तर लागणार, पण लोकांना गावातच रोजगार उपलब्ध झाला.
ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, यांचे सहकार्य मोलाचे राहिले,
ज्यांनी- ज्यांनी सहकार्य केले त्यांचे सर्वांचे आभार!
सुनिल पेकारी,बारखू केंगले, सुभाष भांगरे, श्रावण पेकारी,व गावातील सर्वच लोकांचे सहकार्य मोलाचे राहिले.