श्रमदानातून गाव स्वच्छ
जुन्नर /आनंद कांबळे
जुन्नर तालुक्यातील पाडळी-बारव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील कचरा समस्या श्रमदानातून दूर करण्यात आली.
पाडळी - बारव ग्रामपंचायतीकडे अनेक वेळा तक्रार करुन कचरा समस्येकडे दुर्लक्ष होत होते.
आज मंगळवारी माजी उपसरपंच अरुणदादा पापडे,तंटामुक्ती अध्यक्ष नितीन कबाडी, ग्रामपंचायत सदस्या पुष्पाताई बुट्टे ,गणेश कंठाळे ,विवेक पापडे, सागर बुट्टे ,बाळासाहेब सदाकाळ व ग्रामस्थांनी कचरा गोळा करुन त्याची विल्हेवाट लावली.
ग्रामपंचायतीच्या कामाबद्दल जनतेत नाराजी निर्माण झाली आहे.
याबाबत वारंवार तक्रार करुनही ग्रामपंचायत लक्ष देत नव्हती.
माजी उपसरपंच अरुणदादा पापडे यांनी ग्रामस्थांना आवाहन केल्यानंतर अनेकजण एकत्र आले. बघताबघता गावातील कचरा समस्या सोडविण्यात यश आले.
ग्रामस्थांनी रस्ता ,ओढा,नाले व सार्वजनिक ठिकाणी कचरा न करण्यासाठी सहकार्य करावे व आपले गाव कचरामुक्त करावे असे आवाहन अरुणदादा पापडे यांनी केले.