Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, जानेवारी १९, २०२१

मजुरांच्या वाहनाला अपघात ; स्थलांतरित 15 मजुरांचा मृत्यू

मजुरांच्या वाहनाला अपघात ; स्थलांतरित 15 मजुरांचा मृत्यू


पंतप्रधानांनी व्यक्त केले दुःख
सुरत :
सुरतमधील मांडवी मार्गावर सोमवारी (18 जानेवारी) मध्यरात्री झालेल्या अपघातात १५ जणांचा मृत्यू झालाय. ऊसाचा ट्रक्टर आणि ट्रक एकमेकांना धडकल्याने हा अपघात झाला. चालकाचं ट्रकवरील सुटलं आणि त्याने फूटपाथवर झोपलेल्या लोकांना चिरडलं.

पोलिसांच्या माहितीनुसार, "अपघातात मृत्युमुखी पडलेले सर्व जण मजूर होते. हे मजूर राजस्थानच्या बांसवाडा जिल्ह्यातील कुशलगडचे रहिवासी होते." सध्या पोलिस याप्रकरणी तपास करत आहेत.
सुरतचे पोलीस उपअधीक्षक सी.एम.जडेजा यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले, "नियंत्रण सुटलेल्या ट्रकने ट्रॅक्टरला धडक दिली. त्यात १८ जणांना चिरडलं आणि १३ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एका मुलीचाही समावेश आहे."
 

या अपघाताबद्दल पंतप्रधान मोदी यांनी देखील दुःख व्यक्त केले आहे.

मृतांमध्ये मध्य प्रदेशातील आठ महिला आणि परप्रांतीय कामगारांचा समावेश आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. ही दुर्घटना सूरतपासून ६० किलोमीटर अंतरावर असलेल्या कोसम्बा गावाजवळ घडली, अशी माहिती पोलिसांनी दिली. या अपघातात ट्रक चालक आणि क्लीनरही जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती सूरतच्या पोलिस अधीक्षक उषा राडा यांनी दिली. दरम्यान या अपघातात मृत्यू झालेल्या मजुरांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपयांची मदत देण्यात येईल, असे ट्विट पंतप्रधान कार्यालयाने केले आहे, तर गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनीही मृताच्या नातलगांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची भरपाई जाहीर केली.
 

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.