Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, जानेवारी २६, २०२१

प्रजासत्ताकदिनी चंद्रपुरात गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर तिरंगा टॅक्टर,बाईक रॅली व विराट मोर्चा

प्रजासत्ताकदिनी चंद्रपुरात गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर तिरंगा टॅक्टर,बाईक रॅली व विराट मोर्चा



किसान कामगार मोर्चा व महाराष्ट्र राज्य किसान सभेचे नेतृत्व.

चंद्रपूर :---- शेतकरी विरोधी तीन काळे कायदे रद्द करण्याची मागणी करीत व दिल्ली येथील किसान आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी प्रजासत्ता दिनी दुपारी 1 वाजता आझाद बगीचा येथून रॅली काढून गिरनार चौक गांधी चौक मार्गे राष्ट्रपिता महात्मा गांधी व ड्रा.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून ,केंद्र सरकार विरोधात तीव्र नारेबाजी करीत व हातात तिरंगा झेंडे,लाल बावटा घेऊन विराट टॅक्टर ,बाईक,बैलबंडी सह  रॅली व मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला .यावेळी विविध पक्ष व संघटनांच्या नेत्यांनी मोदी सरकारचा निषेध व्यक्त करत शेतकरी विरोधी तीन काळे कायदे रद्द करण्याची तसेच कामगार विरोधी 4 श्रमसहिंता रद्द करण्यात यावे .पारित वीज विद्युत   विधेयक 2020 मागे घेण्यात यावे . शेतीमालाला हमीभाव देण्यात यावा ,स्वामिनाथन आयोग लागू करण्यात यावे.पेट्रोल डिझेल चे दर व महागाई कमी करण्यात यावी आदी मागण्यांचे निवेदन किसान आंदोलनाला पाठिंबा देत मा.जिल्हाधिकारी मार्फत मा.महामहीम राष्ट्रपती यांना देण्यात आले.
सदर मोर्चाचे नेतृत्व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ.नामदेव कनाके, आयटक नेते कॉ.विनोद झोडगे किसान सभेचे नेते कॉ. ड्रा.महेश कोपु लवार, कॉ.संतोष दास,काँग्रेस नेते रामू तिवारी, गोपाल अमृतकर,माझी महापौर संगीता अमृतकर, नरेंद्र बोबडे आम आदमी पार्टीचे चे
बिवराज सोनी,मयुर राईकवार,सी आय टी यु.चे प्रल्हाद वाघमारे,वामन बुटले,जनविकास सेनेचे पप्पू देशमुख,पुरोगामी नेते किशोर पोतनवार,परमजी त सिंग,संयुक्त ख दान मजूर संघाचे नेते कॉ.दिलीप बर्गी,प्रदीप चीता डे,एम.एस. ई.बी.वर्कर्स फेडरेशन चे केंद्रीय उपाध्यक्ष कॉ.प्रकाश वानखेडे ,किसान सभेचे देवराव चवळे,रामदास डाऊले,दादाराव ठाकरे,कृष्णा चव्हाण,संभाजी राय वाड, आयटक चे राजू गैनवा र,प्रकाश रेड्डी,श्रीधर वाढई,मनोज घोडमारे, छ्या या मोहित्कर,कविता गटलेवार, यासह जील्हातील शेतकरी ,शेतमजूर , कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.