सावली शहरासह तालुक्यातील दहा तरूण एकाच वेळी सैन्यदलात भरती
निफन्द्रा ( प्रतिनिधी)
सावली तालुक्यातील दहा तरुणांची सैन्यदलात एकाच वेळी भरती झाली आहे. सावली तालुक्याच्या इतिहासात प्रथमच १० तरुण देशसेवा करणार असल्यामुळे तालुक्यातील जनतेने अभिनंदन केले आहे.
सावली तालुका दुष्काळी भागातील शेतीप्रधान भात उत्पादक तालुका आहे. शेतीला बारामाही पाणी नसल्याने फक्त पावसाच्या पाण्यावर शेतीचा खरीप हंगाम होतो. येथील जनतेने वर्षानुवर्षे दुष्काळ सहन केला आहे. आजही यात काही बदल झालेला नाही. मात्र, येथील तरुणांनी सैन्यदलात भरती होऊन देशसेवा करण्याचे ठरवत आज तालुक्यातील दिडशेहून अधिक तरुण सैन्यात दाखल झालेले आहेत. यामुळे या तालुक्याला सैनिकांचा तालुका म्हणणे वावगे ठरणार नाही.
नुकत्याच एका भरतील सैन्यात भरती झालेल्या दहा तरूणापैकी तीन जण सावली शहरातील आहेत. या तरूणांनी सैनिक भरतीप्रक्रियेसाठी कोणतेही भरती सराव अँकेडमीत न जाता भरतीप्रक्रिया यशस्वी पूर्ण केली आहे.
सैन्यभरतीसोबतच गावातील अनेक मुलं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेचीदेखील तयारी करीत आहेत. यापूर्वी सावली शहरातील रुन्हय प्रकाश जक्कुलवार यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत तहसीलदार पदी निवड , स्वप्नील मनोहर गेडाम महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पीएसआय साठी तर निलीम मोतीलाल दुधे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सहाय्यक विक्रीकर निरीक्षक पदी निवड झाली होती. या समस्त निवड झालेल्या तरुणांचा आदर्श घेऊन सावली तालुक्यातील तरुणांनी मेहनत घेऊन सैन्यात भरती झाले. निवड झालेले सर्व तरुण सामान्य.शेतकरी कुटुंबातील आहेत. या तरुणामध्ये सायन्स शाखेची मुले सैन्यात देशसेवेसाठी जात आहे.
आपल्या मुलांनी सैन्यात नोकरी मिळविली असल्यामुळे घरच्यांनी आनंदोत्सव साजरा केला आहे. यावेळी सावली शहरातील त्याचप्रमाणे तालुक्यातील जनतेकडून सैन्यभरतीत निवड झालेल्या तरुणांचे आणि त्यांच्या परिवारांचे अभिनंदन केले आहे.
अशी आहेत तरुणांची नावे
१) बादल काशिनाथ खोब्रागडे सावली
२) नितेश दिनेशराव वाढई सावली
३) प्रफुल्ल सुनील बोरकर सावली
४) सुनील सोकाजी मेश्राम कापसी
५) संजय आनंदराव डबले बेलगांव
६) मयुर राजेश मशाखेत्री मोखाळा
७) भास्कर नेताजी गावडे पेंढरी मक्ता
८) प्रणय नत्थुजी निकोडे पेंढरी मक्ता
९) चेतन झाडे ,अंतरगांव
१०) अंकुश श्रीरंग चौधरी विरखल
या तरूणांची निवड झालेली आहे.
आमच्या तालुक्यातील जे तरुण महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि सैन्यात दाखल झाले त्यांची प्रेरणा आम्ही घेतली. त्यातून आवड व इच्छा निर्माण झाली.
बादल काशिनाथ खोब्रागडे