जुन्नर / आनंद कांबळे
महिला हे संस्काराचे उत्तम केंद्र आहे .ज्या समाजात महिलाचा सन्मान होतो त्या समाजाची प्रगती निश्चित होते ."चूल आणि मूल "एवढं मर्यादित क्षेत्र होतं महिलांचं परन्तु केवळ सावित्रीबाई मुळे विविध क्षेत्रात उच्च पदापर्यंत पोहचल्या आहेत .खऱ्या अर्थाने सामाजिक -धार्मिक बंधनातून स्रिया मुक्त होत आहे ,असे गौरवोद्गार पोलिस उपविभागीय अधिकारी मंदार जवळे यांनी जुन्नर येथे व्यक्त केले .
डिसेंट फाउंडेशन व शिवमुद्रा इन्फोटेक प्रा .लि. च्या विद्यमाने सुरू होत असलेल्या *सावित्रीबाई फुले डिजिटल वाचनालय* उदघाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जवळे बोलत होते .
या प्रसंगी नायब तहसिलदार सचिन मुंढे म्हणाले की सावित्रीबाई नी स्वतः पतीकडून शिक्षण घेऊन मुलींसाठी पुण्यात शाळा सुरू केली .बहुजन समाजाला शिक्षणाची दारे खुली केली, त्यांचे योगदान समाज कधी ही विसरणार नाही .
या प्रसंगी जुन्नरचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे , नायब तहसिलदार सचिन मुंढे , नंदनवन -दिव्यांग मुलांच्या संस्थेच्या अध्यक्षा रुपालिताई बोकरिया ,डिसेंट फाउंडेशन चे अध्यक्ष जितेंद्र बिडवई ,लेण्याद्री देवस्थान ट्रस्ट चे माजी अध्यक्ष जयवंत डोके ,विघनहर सहकारी साखर कारखान्याच्या संचालिका पल्लवी डोके , जुन्नर नगरपालिका चे नगरसेवक भाऊसाहेब कुंभार , कृषी अधिकारी बापू रोकडे , डिसेंट फाऊंडेशन चे संस्थापक महेंद्र बिडवई , आरतीताई ढोबळे ,आदिनाथ चव्हाण , दिलीप भगत , राहुल दातखिळे , संदिप ताजने , सुधीर मुथ्था , प्रकल्प समनव्यक फकिर आतार , अश्विनी दातखिळे आदि मान्यवर उपस्थित होते .
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फकिर आतार तर राहुल दातखिळे यांनी आभार मानले .