मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सहकुटुंब व्याघ्र पर्यटनाचा आंनद लुटण्यासाठी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात दाखल झाला आहे. बफर क्षेत्रातील अलिझंझा प्रवेशद्वारावरून दुपारी ३ वाजता सचिनने व्याघ्र सफारीचा आनंद लुटला.
ताडोबा बफर झोनमध्ये सहकुटूंब व्याघ्र सफारीचा आनंद लुटणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला आज तीन वाघ, एक बिबट आणि एका अस्वलाचे दर्शन झाले. व्याघ्र दर्शनाचा मनसोक्त आनंद लुटत तेंडूलकर कुटूंबीय सायंकाळी सफारीवरून रिसोर्टमध्ये परतले अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी किरण धानकुटे यांनी दिली.
आज गणराज्यदिनी सचिन तेंडुलकर याने देशवासीयांना शुभेच्छा दिल्या.
Wishing all of us a very happy #RepublicDay! May the timeless principles on which our great nation stands be our ever guiding light.
सभी को गणतंत्र दिवस की हार्दिक शुभकामनाएं।
उम्मीद करता हूं जिन महान सिद्धांतों पर हमारे देश की नींव रखी गई है, वे हमें हमेशा प्रेरित करते रहें।
असे त्याने संदेशात म्हटले आहे.
विशेष म्हणजे, सचिन गेल्या वर्षी २४ जानेवारीला ताडोबात व्याघ्र सफारीसाठी आला होता. आता वर्षभरानंतर पुन्हा एकदा ताडोबामध्ये कुटुंबीयांसह तो आल्याने आनंद व्यक्त करण्यात येत आहे.