• प्रजासत्ताक दिनाच्या निमित्याने उद्या मेट्रो यात्री सेवा रात्री ९.०० वाजता पर्यंत उपलब्ध
• मेट्रो स्टेशनवर आकर्षक रौषणाई
• मेट्रो स्टेशन येथे देशभक्ती गीत गायन
नागपूर २५ : ७२ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संधेला ऑरेंज लाईन मार्गिकेवरील जय प्रकाश नगर मेट्रो स्टेशन व ऍक्वा लाईन मार्गिकेवरील सुभाष नगर मेट्रो स्टेशन आकर्षक रौषणाई ने सजविण्यात आले असून सिताबर्डी इंटरचेंज मेट्रो स्टेशन येथे आकर्षक सेल्फी पॉइंट तयार करण्यात आले आहे. तसेच दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत सुभाष नगर मेट्रो स्टेशन येथे सीआरपीएफ पथक द्वारे बँडचे सादरीकरण करण्यात येणार आहे व सायंकाळी ४ ते ७ वाजेपर्यंत सुरसंगम समूह तर्फे सचिन आणि सुरभी ढोमणे देश भक्ती गीताचा कार्यक्रम सादर करतील व त्रिविधा कला निकेतन ललित कला संस्थाच्या वतीने श्रीमती अवंती काटे व पूजा हिरवटे भारत नाट्यमचे प्रस्तुतीकरण सिताबर्डी इंटरचेंज मेट्रो स्टेशन येथे सादर करतील. ! या व्यतिरिक्त प्रजासत्ताक दिनाच्या निमित्याने मेट्रो प्रवासी सेवा उद्या रात्री ८ वाजताच्या ऐवजी ९.०० वाजता पर्यंत उपलब्ध असेल याची सर्व नागरिकांनी नोंद ध्यावी.
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्याने मेट्रो स्टेशन येथे विविध कार्यक्रम
• रहाटे कॉलोनी मेट्रो स्टेशन येथे ४ ते १५ वयोगटांच्या मुलांकरिता चित्रकला स्पर्धेचे आयोजन दुपारी ३.३० ते ४. ३० वाजेपर्यंत करण्यात आले आहे.
• रहाटे कॉलोनी मेट्रो स्टेशन येथे लहान मुलांद्वारे दुपारी ४ ते ५.३० वाजेपर्यंत स्केटिंगचे सादरीकरण
• ३. सुभाष नगर मेट्रो स्टेशन येथे भाग्यश्री अकादमी व राग रॉक्स तर्फे सायंकाळी ४ ते ६ वाजेपर्यंत संगीताचा कार्यक्रम
• ४. एयरपोर्ट मेट्रो स्टेशन येथे अक्षरायन तर्फे दुपारी ३.३० ते ४. ३० वाजेपर्यंत कॅलिग्राफी शो चे आयोजन करण्यात आले आहे.
याशिवाय मेट्रो स्टेशन येथे विविध वस्तूंचे, दागिन्यांचे तसेच आरोग्यासाठी उपयुक्त वस्तूंचे स्टॉल येथे लावण्यात आले आहे. याशिवाय थेट शेतातून आलेल्या धनधान्याचे स्टॉल, महिला बचतगटाने बनविलेल्या गृहउद्योगाच्या वस्तू-पदार्थ येथे विक्रीला ठेवण्यात येणार आहेत. तसेच विविध चवीचे, नागपूरची विशेषता असणारे खाद्य पदार्थांचे स्टॉल देखील लावण्यात आले आहे.