नासुप्र येथे 'राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद' जयंती साजरी
नागपूर, १२ जानेवारी २०२१: महाराष्ट्राचे आराध्य वीरमाता, राजमाता जिजाऊ आणि बलशाली भारताचे स्वप्न साकार करणारे, तरुणांचे स्फूर्तिस्थान स्वामी विवेकानंद यांची जयंती आज मंगळवार, दिनांक १२ जानेवारी रोजी सदर स्थित नागपूर सुधार प्रन्यासच्या मुख्यालयात साजरी करण्यात आली. नामप्राविप्रा'चे अपर आयुक्त श्री. हेमंत पवार आणि नासुप्र'चे महाव्यवस्थापक व नामप्रविप्रा'च्या नगर रचना विभागाचे उप-संचालक श्री. राजेंद्र लांडे यांच्याहस्ते 'राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद' यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी नासुप्र व नामप्रविप्रा'चे इतर अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.