चंद्रपूर जिल्हा कारागृहात कायदेविषयक मार्गदर्शन शिबीराचे आयोजन
दि.29/01/2021 : चंद्रपूर जिल्हा कारागृह वर्ग-१ येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली यांचे वतीने बंदीबांधवा करिता कायदेविषयक मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून कारागृह अधीक्षक वैभव आगे, प्रमुख मार्गदर्शक म्हणून सन्मा. न्या.डी.डी.फुलझेले, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली उपस्थित होते. प्रमुख उपस्थितीमध्ये कारागृहाचे अतिरिक्त वरीष्ठ तुरुंगाधिकारी रविंद्र जगताप, तुरुंगाधिकारी नागनाथ खैरे, तुरुंगाधिकारी विठ्ठल पवार, तुरुंग शिक्षक ललित मुंडे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेतून कारागृहाचे अतिरिक्त वरीष्ठ तुरुंगाधिकारी रविंद्र जगताप यांनी कार्यक्रमाचे स्वरुप बंदीवांनाना समजावून सांगीतले. तदनंतर सन्मा. न्या.डी.डी.फुलझेले, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांनी बंदीबांधवांना विधी सहाय्य व कायदेविषयक मार्गदर्शन करीत प्रोबेशन ऑफेंडर्स ऍक्ट, सी.आर.पी.सी, ४३६, ४३७-ए, ४३७ - पोटालम ६ इत्यादीच्या लाभ याबाबत बंद्याना कायदेविषयक मार्गदर्शन केले. तर अध्यक्षीय भाषणामध्ये वैभव आगे, कारागृह अधीक्षक यांनी कारागृहातील बंद्याचे अधिकार, जामीन मिळण्याचा अधिकार, कायदेविषयक सुविधा, ज्यामध्ये प्राधिकरणा मार्फत मोफत वकील, प्ली बार्गेनिंग इत्यादीबाबत बंदीजनांना मार्गदर्शन केले.सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन तुरुंग शिक्षक ललित मुंडे यांनी केले. सदर शिबीराचे यशस्वीतेसाठी वरिष्ठ तुरुंगाधिकारी वैभव आत्राम, तुरुंगाधिकारी नागनाथ खैरे,सुनिल वानखडे, विठ्ठल पवार, कारागृहाचे सुभेदार, देवाजी फलके, शिवराम चवळे, सीताराम सुरकार, शिपाई लवकुश चव्हान, राजेंद्रसिंग ठाकूर, विजय बन्सोडे, इत्यादीं सह इतर कारागृह कर्मचारी यांनी विशेष परीश्रम घेतले.