राज्यातील महिलांसाठी महत्वाची बातमी ! -
पिठाची गिरणी ,तसेच छोटे दुकान आदींसाठी मिळणार अनुदान -विशेष पॅकेज जाहीर
राज्यतील महिलांना घरघुती उद्योगासाठी विविध साहित्य पुरविणे या योजनेंतर्गत मिळणाऱ्या अनुदानात आता वाढ करण्यात आली आहे
वस्तुवाटप करताना प्रति महिला जास्तीत जास्त २० हजार रुपयांऐवजी ३० हजार रुपये खर्च करण्यात येतील - ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी याविषयी माहिती दिली
पहा कशासाठी मिळते अनुदान ?
महिला व बालकल्याण योजनेंतर्गत महाराष्ट्र सरकरने पिठाची गिरणी, सौर कंदील, शिलाई मशीन, पिको फॉल मशीन तसेच प्रचलित परिस्थितीनुसार पल्वराईझर म्हणजे ओले/ सुके उळण यंत्र -
तसेच पशुधन संगोपन, छोटे किराणा दुकान, मिनी दाल मिल, घरगुती फळप्रक्रिया उद्योग, घरगुती मसाला उद्योग - इत्यादीसाठी साहित्य पुरविण्याबाबत निर्णय घेतला आहे.
यावेळेस वस्तुवाटप करताना प्रति महिला जास्तीत जास्त २० हजार रुपयांऐवजी ३० हजार रुपये खर्च करण्यात येणार आहे