Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, जानेवारी २०, २०२१

खून प्रकरणातील आरोपीना अटक

खून प्रकरणातील आरोपीना अटक


शिरूर येथील गोळीबार खुन प्रकरणातील दोघे आरोपी ताब्यात

पुणे ग्रा. LCB पथकाची कामगिरी

जुन्नर /आनंद कांबळे

दिनांक १८/०१/२०२१ रोजी १२.०० वा. चे सुमारास मौजे टाकळी हाजी मळगंगा हॉटेलचे पाठीमागे  वाळु व्यवसायाचे तसेच उसने पैशाचे कारणावरून  स्वप्नील छगन रणसिंग वय २४ रा.टाकळी हाजी ता.शिरूर जि.पुणे याचा आरोपी १)विजय उर्फ कोयत्या गोविंद शेंडगे २)आकाश उर्फ बबलु खंडु माशेरे दोघे रा.आमदाबाद ता.शिरुर जि.पुणे व इतर यांनी संगनमत करून होंडा शाईन मोटार सायकलवर येवुन पिस्तुलमधन गोळया झाडुन खुन केला व स्वप्नील सुभाष गावडे यास गोळी मारून जखमी केले. याबाबत मयत स्वप्नील छगन रणसिंग वय २४ याचे पत्नीने दिलेले फिर्यादीवरून शिरुर पो.स्टे. गु.र.नं. ४२/२०२१ भादंवि क .३०२, ३०७, १२०(ब), ३४ आर्म ॲक्ट क.३,२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
      सदर गंभीर गुन्ह्याचा समांतर तपास मा.पोलीस अधीक्षक सो. यांचे आदेशाने अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते,उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट सो यांचे मार्गदर्शनाखाली LCB  पथकाने करून गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीवरुन आरोपी 
१) विजय उर्फ पप्पू उर्फ कोयत्या गोविंद शेंडगे वय २५ वर्षे रा.आमदाबाद ता.शिरुर जि.पुणे
२) आकाश उर्फ बबलू खंडु माशेरे वय २४ वर्षे रा.आमदाबाद, ता.शिरूर, जि.पुणे
      यांना मौजे शिक्रापूर पुणे-नगर हायवे रोड वरील शिक्रापूर-चाकण चौक येथून ताब्यात घेतलेले आहे .
       सदर दोन्ही आरोपींची वैदयकिय तपासणी करुन त्यांना शिरूर पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आलेले आहे.
      

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.