Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, जानेवारी २२, २०२१

गडचिरोली जिल्ह्यातील विषारी दारू प्रकरणी दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावे - आमदार डॉ देवराव होळी

गडचिरोली जिल्ह्यातील विषारी दारू प्रकरणी दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावे - आमदार डॉ देवराव होळी



विषारी दारू पिऊन मृत्यू झालेल्या कुटुंबीयाना पाच लाखाची आर्थिक मदत व प्रकृती गंभीर असलेल्या नागरिकांना एक लाख रुपयाचा आर्थिक मदत करण्यात यावे!..

चामोर्षी - 21/1/2021 गुरुवार काल चामोर्शी तालुक्यातील लक्ष्मणपुर येथे ग्रामपंचायत निवडणूक होते त्यामुळे एका उमेदवाराने सायंकाळी सात वाजताच हातभट्टी ची दारू वाटणे सुरू केली ज्यांनी दारूचे सेवन केले त्यांची प्रकृती दुपारपासून बिघडली व प्रकाश फकिरा
गौरकर (53) व रमेश नानाजी डूमणे (52) यांचा मृत्यू झाला
व भगीरथ गोविंदा व्हट्टे (52) बालाजी नारायण डवले (60)शामराव काशिनाथ गौरकर (60) राजेंद्र काशिनाथ गौरकर (40)यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलवण्यात आले तसेच बापूजी नांदेकर ( 65) यांच्यावर आष्टी येथे उपचार सुरू आहेत या विषारी प्रकरणी बोलतांना सध्या विधानसभा मतदार संघ कामकाज निमित्त मुंबई येथे असलेले गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ देवराव होळी यांनी दुःख व्यक्त केले व दूरध्वनी वर बोलतांना सांगितले या विषारी दारू प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा व मृतकांच्या कुटुंबियांना पाच लाखाची व प्रकृती गंभीर असलेल्या नागरिकांना एक लाख रुपयाचा आर्थिक मदत तत्काळ करण्यात यावा अशी मागणी राज्य सरकारला त्यांनी केली

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.