Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, जानेवारी ०८, २०२१

मतिमंद -दिव्यांग, अंध , अपंगांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा -डॉ दीपक शहा



लायन्स-नंदनवन भवन उदघाटन सोहळा

जुन्नर /आनंद कांबळे
मानव जीवन अनमोल आहे.अन्न , वस्त्र, निवारा ह्या गरजा पूर्ण झाल्यावर दगडातील देव शोधण्यापेक्षा माणसातला देव शोधावा , माणसाने माणसाबरोबर मानसासारखे वागावे.दिव्यांग-मतिमंद , अंध , अपंग यांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे .नंदनवन संस्थेच्या वतीने होत असलेले सामाजिक, शैक्षणिक कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे,असे गौरवोद्गार धामणखेल येथे उदघाटन प्रसंगी लायन डॉ दिपक शहा यांनी व्यक्त केले.
धामणखेल ( ता जुन्नर ) येथे माय ऍक्टिव्हिटी सेंटर संचलित व लायन्स क्लब ऑफ शिवनेरी चे शिवनेरी लायन्स फाउंडेशन पुरस्कृत लायन्स नंदनवन भवन व ला डॉ दिपक शहा सभागृह(लायन्स क्लब ऑफ तळेगाव) चे उदघाटन प्रसंगी माजी प्रांतपाल डॉ दिपक शहा बोलत होते .
या प्रसंगी उदघाटक लायन्स क्लब इंटरनॅशनलचे डी 3234डी चे प्रांतपाल CA ला.अभय शास्त्री मनोगत व्यक्त करताना म्हणाले की ,कोरोना सारख्या महामारी नेआपणास दाखवून दिले आहे की, जीवन किती अनिश्चित आहे, म्हणून माणुसकीचे नाते जपा , वंचित घटकांना मदत करा , मनुष्य जीवनात देण्याची संधी देवाने आपल्याला दिली आहे , संधीच सोनं करू या , नंदनवन च्या कामात लायन्स क्लब नेहमी बरोबर असेल, तुमचं कार्य खरोखर देवकार्य आहे .  तसेच लायन्स क्लब ऑफ तळेगाव व ला डॉ दिपकभाई शहा यांचे सहकार्य खूप मोलाचे आहे व सुर्यपूत्र डेव्हलपर्स जुन्नर यांचे भवन निर्मिती साठी  विशेष सहकार्य लाभले
      या कार्यक्रमास  , प्रांत कॅबिनेट खजिनदार ला.संतोष सोनावळे , एल सी आय एफ समनव्यक ला.सुनिल जाधव, रिजन चेअरपर्सन ला.मनोज भळगट ,झोन चेअरपर्सन ला दीपा जाधव , शिवनेरी लायन्स फाऊंडेशन अध्यक्ष ला.शिरीष जठार (प्रोजेक्ट इंचार्ज ) , लायन्स क्लब ऑफ तळेगांव, अध्यक्षा प्रमिला वाळुंज , लायन्स क्लब ऑफ जुन्नर -शिवनेरी चे अध्यक्ष मिलिंद झगडे , खजिनदार बंडू कर्पे , सचिव भालेकर सर ,प्रशांत शहा , अनुराधा शास्त्री ,डॉ भंडारी , तसेच नंदनवन संस्थेच्या अध्यक्षा रुपालिताई बोकरिया , माजी अध्यक्षा शशी गायकवाड ,उपाध्यक्ष फकिर आतार , सचिव विकास घोगरे , खजिनदार पंकज वरपे , संचालक सुभाष शिंदे , सं चालक सुभाष मोहरे , संचालिका अश्विनी घोगरे ,सूर्यकांत ढोले , इरफान शेख , सुभाष बोकरिया , लायन्स लिओ क्लब चे अध्यक्ष रोहन पाटे , उपाध्यक्ष अभय वाव्हळ व सर्व लायन्स परिवार व नंदनवन परिवार आदि मान्यवर उपस्थित होते .
      या कार्यक्रमात विकास घोगरे यांनी  उपस्थितांचे स्वागत करून नंदनवन ची माहिती सांगितली , तर शिवनेरी लायन्स फाउंडेशन चे अध्यक्ष शिरीष जठार यांनी प्रास्ताविक केले ,या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन फकिर आतार तर सुभाष शिंदे यांनी आभार मानले .सामूहिक पसायदानाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला .

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.