राष्ट्र मंदिर निर्माणासाठी तन-मन-धनाने सहकार्य करा -प्रा उमेश मेंढे
संजीव बडोल प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.20 जानेवारी:-
तब्बल पाचशे वर्षाच्या न्यायालयीन लढाईनंतर अयोध्येतील प्रभू श्री राम मंदिर जागेचा ताबा हिंदू साधू संतांकडे देण्यात आलेला आहे . न्यायालयाच्या निर्देशानुसार सदर जागेवर भव्य दिव्य श्रीराम मंदिर होऊ घातले आहे. सदर मंदिर निर्माणासाठी देशातील सर्व राम भक्तांनी राष्ट्र मंदिर निर्माणासाठी तन-मन-धनाने सहकार्य करावे. असे आव्हान प्रा. उमेश मुंडे संघविभाग कार्यवाह यांनी नवेगावबांध येथील निधी समर्पण कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी केले आहे.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डॉ.अभीमन कापगते, ग्राम समिती सहप्रमुख नितीन पुगलिया, ग्राम समिती प्रमुख मुलचंद गुप्ता , पंडित चंपालाल शर्मा, डॉ. लताताई लांजेवार ,डॉ. नत्थु कोसरकर, एकनाथ बोरकर आदि उपस्थित होते. याप्रसंगी प्रभू श्रीराम व भारतमातेच्या प्रतिमेचे विधीवत पूजन करून, दीपप्रज्वलनाने सदर निधी समर्पण कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख अतिथी डॉ.अभिमन कापगते यांनी श्रीराम मंदिरासाठी 11111 रुपयाची देणगी दिली तसेच नितीन पुगलिया यांनी पाच हजार रुपयांची देणगी उद्घाटनप्रसंगी दिली. सदर कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी कार सेवेसाठी गेलेल्या नवेगावबांध येथील नाजूक नाकाडे ,यशवंत बहेकार ,माधव नाकाडे ,रामदास कापगते ,हेमराज गहाणे ,गिरिधरी लांजेवार ,माधव डोंगरवार यांचा भगवे दुपट्टे देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी प्रमुख अतिथींनी समयोचित मार्गदर्शन केले .कार्यक्रमाचे संचालन महादेव बोरकर यांनी केले, प्रास्ताविक पंढरी काशीवार यांनी तर उपस्थितांचे आभार दिलीप पोवळे यांनी मानले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अशोक हांडेकर ,चंद्रसिंह पवार, गजानन बावने, बाळकृष्ण डोंगरवार रघुनाथ लांजेवर ,सरपंच अनिरुद्ध शहरे खुशाल काशिवार,शैलेष जयस्वाल ,विजयाताई कापगते, नरुले सर, शारदाताई नाकाडे ,डॉ. दिलीप पनपालिया आदींनी सहकार्य केले. याप्रसंगी बहुसंख्य राम भक्त उपस्थित होते.