Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, जानेवारी २०, २०२१

बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना शिक्षण शास्त्र विषय घेऊन एप्रिल-मे 2021 च्या परीक्षेत बसण्याची संधी मिळणार

बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना शिक्षण शास्त्र विषय घेऊन एप्रिल-मे 2021 च्या परीक्षेत बसण्याची संधी मिळणार


डॉ पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्या लढ्याला यश

नागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार शैक्षणिक वर्ष 2019- 20 पासून शिक्षण शास्त्र हा विषय केवळ कला शाखेसाठी ऐच्छिक विषय म्हणून ग्रुप सी मध्ये समाविष्ट करण्यात आला होता. परंतु हा बदल शिक्षण शास्त्र विषय शिकवणाऱ्या महाविद्यालयापर्यंत न पोहोचल्यामुळे विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी सत्र 2019- 20 मध्ये शिक्षण शास्त्र विषय घेऊन दोन वर्ष अभ्यास केला. परंतु बारावी बोर्डाचे फॉर्म भरतेवेळी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना शिक्षण शास्त्र विषय निवडता येत नव्हता. त्यामुळे पालक विद्यार्थी व शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेने ही समस्या तात्काळ शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांचे निदर्शनात आणून दिली शिक्षणमंत्र्यांनी तात्काळ यासंबंधी कार्यवाही करून विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना एप्रिल-मे 2021 च्या परीक्षेत शिक्षणशास्त्र विषय घेऊन प्रविष्ट होण्याचा मार्ग मोकळा केला, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्या प्रयत्नांना मोठे यश आले आहे.
 डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्या वतीने संघटनेचे कार्याध्यक्ष प्रा. शेषराव येलेकर,   व विभागीय अध्यक्ष संजय निंबाळकर,कीर्ती काळमेघ,मेघराज गवखरे, नंदलाल यादव,गौरव शिंदे,विनोद चिकटे,  यांनी शिक्षणमंत्री ना. वर्षाताई गायकवाड, शिक्षण राज्यमंत्री ना. बच्चू कडू, विधान परिषदेचे आमदार ना.गो. गाणार, आमदार कपिल पाटील, आमदार विक्रम काळे, अप्पर  उच्च शिक्षण सचिव मा. वंदना कृष्णा मॅडम, शिक्षण आयुक्त पुणे, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च  माध्यमिक राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष व सचिव, शिक्षण उपसंचालक, महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक महासंघाचे अध्यक्ष प्रा. डॉ. संजय शिंदे,  यांना तातडीने निवेदने पाठवून विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवू नये व कोणताही शिक्षक या बदलामुळे अतिरिक्त ठरू नये, यासाठी तातडीने मार्ग काढण्याची विनंती केली अन्यथा डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेतर्फे महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शासनाला देण्यात आला होता.
     यासाठी नागपूर येथील इंदिरा काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ सदस्य प्रकाश वसू यांनी पुढाकार घेऊन राज्यमंत्री सुनील केदार, पदवीधर आमदार अभिजित वंजारी यांचे समवेत शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांची भेट घेऊन या संदर्भात सविस्तर चर्चा केली. शिक्षणमंत्र्यांनी कोणत्याही विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही तसेच कोणताही शिक्षक अतिरिक्त ठरणार नाही याची खबरदारी घेण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले व लगेच शिक्षण सचिवांना तशा सूचनाही दिल्या.
       नुकतेच 18 जानेवारी रोजी शालेय शिक्षण विभागाने शासन परिपत्रक काढून जुन्या विषय योजनेनुसारच विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना एप्रिल-मे 2021 च्या बोर्डाच्या परीक्षेत शिक्षणशास्त्र विषय घेऊन प्रविष्ट होण्याची संधी देण्यात आली आहे.
     19 जानेवारी 21 पासून शिक्षण शास्त्र हा विषय विज्ञान शाखेस निवडण्यासाठी राज्य मंडळाने लिंक सुरू केली आहे.
     डॉ पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्या प्रयत्नामुळे महाराष्ट्रातील विज्ञान शाखेतील हजारो विद्यार्थ्यांना एप्रिल-मे 2021 च्या बोर्डाच्या परीक्षेत  शिक्षण शास्त्र विषय घेऊन प्रविष्ट होण्याची संधी मिळाली आहे.

         संजय निंबाळकर, नागपूर विभागीय अध्यक्षडॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद महाराष्ट्र

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.