ओळख कर्तृत्वाची भाग - 13
कर्मवीर मा.सा.उपाख्य दादासाहेब कन्नमवार
!! 13 !!
आपल्या देशात वाढदिवस साजरा करण्याची प्रथा फार जुनी आहे.आधुनिक भारतात मात्र काही पुढाऱ्यांचे जन्मदिवस विशिष्ट नावाने साजरे केले जातात. उदा. पंडित जवाहरलाल नेहरूचा 'बालकदिन', राष्ट्रपती डॉ.राधाकृष्णन यांचा 'शिक्षकदिन' , आचार्य विनोबा भावे यांचा 'भूदानदिन' त्याचप्रमाणें 10 जानेवारी हा कन्नमवारांचा जन्मदिन 'ग्रामजयंती' म्हणुन साजरा व्हावा अशी त्यांची इच्छा होती. त्यांचा वाढदिवस पहिल्यांदा ते आरोग्यमंत्री झाल्यानंतर 56 व्या वाढदिवशी साजरा करण्यात आला. कन्नमवारांनी जनतेची जी सेवा केली, त्या सेवेचा गौरव करावा म्हणून प्रांतातील जनतेने 1956 साली 10 जानेवारीला त्यांचा वाढदिवस नागपूर येथे पंडित कुंजी लाल दुबे यांच्या अध्यक्षतेखाली भोसले नाट्यग्रुह, महाल येथे साजरा केला.तेव्हा ते म्हणाले, " माझाच वाढदिवस का? माझ्यासारखे अन्य लाखो लोक आहेत, त्यांचे वाढदिवस का साजरे होऊ नयेत? त्यांच्यात व माझ्यात काय फरक आहे? म्हणुन माझ्या एकट्याचाच वाढदिवस साजरा न करता संपूर्ण गावाचा वा नगराचा वाढदिवस साजरा करण्यात यावा व त्यास 'ग्रामजयंती'संबोधण्यात यावे, तरच त्यात मला समाधान राहील"
अश्या या महामानव कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांचा जन्मशताब्दी वर्ष केव्हा सुरू झाले आणि संपले आहे, हे राज्यकर्त्याच्याच नव्हे, तर मराठी जनतेच्याही लक्षात आल नाही.
खिमेश मारोतराव बढिये
प्रचारक (नागपूर)
दादासाहेब कन्नमवार प्रचार व प्रसार समिती नागपूर
8888422662, 9423640394