ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी
निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत सदस्यासाठी किमान 7 वी पासची अट घातली आहे. मात्र यामध्ये ज्या संभाव्य उमेदवाराचा जन्म 1 जानेवारी 1995 नंतर झाला आहे, त्यांच्यासाठी ही अट लागू आहे. तत्पूर्वी जन्म झालेल्यांसाठी यामध्ये शिथिलता देण्यात आलेली आहे.
येत्या 15 जानेवारीला जिल्ह्यात 230 ग्रामपंचायतीमध्ये निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीसाठी नामांकन अर्ज भरणे बुधवारपासून सुरू झाले आहेत. पहिल्या दिवशी फारसा प्रतिसाद इच्छुकांकडून मिळालेला नाही. या निवडणुकीत पहिल्यांदा उमेदवारांसाठी शिक्षणाची अट ठेवली आहे. ग्रामपंचायत सदस्यांसाठी सातवी पासची अट ठेवण्यात आल्याने अशिक्षित वा कमी शिकलेले इच्छूक या निवडणुकीपासून वंचित राहणार आहेत. जिल्ह्यातील 230 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांना सुरुवात झाली असून 23 ते 31 डिसेंबर यादरम्यान नामनिर्देशनपत्रे दाखल होणार आहेत. 31 डिसेंबर रोजी आलेल्या नामनिर्देशनपत्रांची छाननी होणार आहे.
4 जानेवारीपर्यंत अर्ज माघार घेण्याची मुदत देण्यात आली आहे. 4 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजल्यानंतर संभाव्य उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात येणार आहे. यासाठी 15 डिसेंबर रोजी मतदानाची प्रकि‘या पूर्ण होणार आहे.
मतमोजणी 18 जानेवारी रोजी होणार आहे. त्यामुळे संभाव्य उमेदवार आता निवडणुकीच्या कामाला लागले असून यासाठी आता निवडणूक यंत्रणाही सज्ज झाली आहे. प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये निवडणूक निर्णय अधिकार्यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. ऑनलाईन अर्ज भरून त्यासोबत आवश्यक असणारी कागदपत्रे आणि घोषणापत्रे उमेदवारांनी ऑफलाईनमध्ये संबंधित गावासाठी नेमण्यात आलेल्या निवडणूक निर्णय अधिकार्यांकडे आणून देण्याच्या सूचना प्रशासनाच्यावतीने करण्यात आल्या आहेत.
या निवडणुकीत विधानसभा मतदारसंघाची 25 सप्टेंबर 2020 रोजी अस्तित्वात असलेली मतदार यादी या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यानुसार तयार करण्यात आलेल्या ग‘ामपंचायतींच्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या 1 डिसेंबरला प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. त्यावर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी 7 डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार अंतिम मतदार याद्या 14 डिसेंबरला प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या निवडणुकीसाठी ग‘ामीण भागातील तरुणांमध्ये चांगलाच उत्साह दिसून येत आहे. .

निवडणूक कार्यक्रम असा आहे
- अर्ज दाखल करणे- 23 ते 30 डिसेंबर
- छाननी- 31 डिसेंबर
- अर्ज माघारी, चिन्ह वाटप- 4 जानेवारी 2021
- मतदान- 15 जानेवारी
- मतमोजणी--18 जानेवारी