जुन्नर /आनंद कांबळे
जुन्नर येथील श्री शिव छत्रपती कॉलेजचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत मंडलिक यांच्या घरातील परस बागेत घरगुती कचऱ्या पासून खत निर्मिती कशी करावी याची कार्यशाळा घेण्यात आली.
'माझी वसुंधरा' अभियाना अंतर्गत जुन्नर नगरपालिकेने आयोजीत केलेल्या या कार्यशाळेत 50 महिलांनी सहभाग घेतला. या प्रसंगी सौ. विजया चंद्रकांत मंडलिक यांनी प्रात्यक्षिकाद्वारे झाडांचा पाला- पाचोळा, घरातील पालेभाज्यांचा कचरा, फळांच्या साली, माती, व शेणखत इत्यादींचा वापर करून आपण सेंद्रिय खत कसे तयार करावे हे महिलांना सांगितले. प्राचार्य डॉ. चंद्रकांत मंडलिक म्हणाले हवेचे व पाण्याचे प्रदूषण रोखण्यासाठी महिलांनी घरगुती ओल्या कचऱ्या पासून खतनिर्मिती करावी. आजच्या काळात पर्यावरणाचे संवर्धन व संरक्षण करण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थान बरोबर समाजातिल प्रत्येक घटकाची आहे. मानवाचे व प्राण्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी जुन्नर नगरपालिका विविध उपक्रमांमार्फत माहिती देत आहे.
स्वच्छता अभियानात जुन्नर शहराने प्रथम क्रमांक मिळवला असून याही उपक्रमात अग्रगनी राहण्यासाठी मुख्याधिकारी श्री. मच्छिंद्र घोलप व नगराध्यक्ष श्री. श्याम पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका कर्मचारी घरोघरी जाऊन ओल्या कचऱ्यापासून सेंद्रिय खत निर्माण करण्याचे प्रशिक्षण महिलांना देत आहेत.
या कार्यशाळेचे प्रस्ताविक सौ. दिप्ती कुलकर्णी यांनी केले.आवटे चित्रा यांनी 'माझी वसुंधरा'- हरित ची शपथ महिलांना दिली. शहर अभियंता सौ.शिल्पा निंबाळकर, आरोग्य अधिकारी श्री.प्रशांत खत्री, नोडल अधिकारी राहुल गोरे, स्वप्नील जावळे व प्रकाश चव्हाण यांनी कार्यशाळेचे आयोजन केले. संगणक अधिकारी संदीप इंगोले यांनी सूत्र संचालन केले.