Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, डिसेंबर ०३, २०२०

नागपूर पदवीधर मतदार संघ : महाआघाडीचे अभिजित वंजारी विजयी


नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणूक



भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचेअभिजित वंजारी विजयी घोषित
नागपूर पदवीधर निवडणुकीमध्ये 17व्या एलिमिनेशन फेरीनंतर कोटा पूर्ण केल्यामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार श्री. अभिजित वंजारी यांना विजयी घोषित करण्यात आले आहे. 17 व्या एलिमिनेशन फेरीनंतर अभिजित वंजारी यांना 61 हजार 701 तर भाजपचे संदीप जोशी यांना 42 हजार 791 मते मिळाली. या निवडणुकीसाठी 60 हजार 747 मतांचा कोटा ठरवण्यात आला होता.
.....




जवळपास ५० वर्षानंतर नागपूर पदवीधरची जागा भाजपनं गमावली. महाविकास आघाडीच्या अभिजित वंजारी यांनी भाजपच्या संदीप जोशी यांचा पराभव केला. भाजपसाठी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी मोठा धक्का.

नागपूर पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे अॅड अभिजित वंजारी विजयी. सकाळी 9.30 ला प्रमाणपत्र घेण्यास मतदान केंद्रावर जाणार .

नागपूर पदवीधर मतदारसंघात दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीत आघाडीचे अभिजित वंजारी यांना 56155, तर भाजपाच्या संदीप जोशी यांना 41622 मते.

........
पहाटे 5 वाजता..
नागपूर विभाग #पदवीधर निवडणुकीमध्ये पाचव्या फेरीअखेर विजयी होण्यासाठी आवश्यक असणारा मतांचा कोटा कोणताही उमेदवार पूर्ण करू शकला नाही. त्यामुळे मतदान प्रक्रियेतील भाग क्रमांक दोनला सुरुवात झाली.

दुसऱ्या पसंतीक्रमाच्या मतमोजणीला आज पहाटे सुरुवात करण्यात आली आहे.
पाचव्या फेरीअखेर एकूण १ लाख ३३ हजार ५३ मतांपैकी ११ हजार ५६० अवैध व १ लाख २१ हजार ४९३ मते वैध ठरलीत. पुढील प्रमाणे उमेदवारांना पहिल्या पसंतीचे मते मिळाली आहे.अभिजीत वंजारी ५५ हजार ९४७, संदीप जोशी ४१ हजार ५४०






...............
.... रात्री... 12
२८ हजार मतमोजणीतील पहिल्या पसंतीची उमेदवारांना मिळालेल्या मतांची घोषणा

नागपूर, दि.३: नागपूर विभाग पदवीधर निवडणुकीमध्ये पहिल्या २८ हजार मतांपैकी २ हजार २३४ अवैध व २५ हजार ७६६ मते वैध ठरलीत. यामध्ये पुढील प्रमाणे उमेदवारांना पहिल्या पसंतीचे मते मिळाली आहे.

विभागीय आयुक्त डॉ संजीव कुमार यांनी जाहीर केलेली पहिल्या पसंतीची उमेदवार निहायमते पुढील प्रमाणे आहेत.
अभिजीत वंजारी १२ हजार ६१७, संदीप जोशी ७ हजार ७६७, राजेंद्रकुमार चौधरी ४७, इंजीनियर राहुल वानखेडे ७६४, ॲङ सुनिता पाटील ४०, अतुलकुमार खोब्रागडे १ हजार ७३४, अमित मेश्राम १०, प्रशांत डेकाटे ३६०, नितीन रोंघे ६६,
नितेश कराळे १ हजार ७४२, डॉ. प्रकाश रामटेके ३८, बबन तायवाडे २५, ॲड.मोहम्मद शाकीर अ.गफ्फार ६, सी.ए. राजेंद्र भुतडा ४३५, प्रा.डॉ. विनोद राऊत ४२, ॲड. विरेंद्र कुमार जायस्वाल २५, शरद जीवतोडे ८,
प्रा.संगीता बढे १६ आणि
इंजीनियर संजय नासरे २४ मते पडली आहेत.
दुस-या फेरीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे.



दुपारी 2

नागपूर - पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतील मत पेट्यांची तसेच पोस्टल मतांची सरमिसळ पूर्ण झाली आहे. पहिला कल 3 वाजता येणार


नागपूर पदवीधर निवडणुकीच्या प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात, 28 टेबलवर सुरु झाली मतमोजणी, पहिल्या फेरीचा कल 3 वाजेपर्यंत येण्याची शक्यता आहे.

मतमोजणी चार कक्षात 28 टेबलवर होत आहे. 25 मतपत्रिकांचा एक गठ्ठा याप्रमाणे सर्व मतपत्रिका एकत्रित करण्यात येतील. यातून 25 मतपत्रिकांचा एक गठ्ठा याप्रमाणे 40 गठ्ठे अशी एक हजार मते प्रत्येक टेबलवर करण्यात येत आहेत. या टेबलवर प्रथम क्रमांकाच्या पसंतीनुसार मतपत्रिकांचे वर्गीकरण होईल. एकूण वैध मतांप्रमाणे ठरविण्यात आलेला मतांचा कोटा पूर्ण झालेला नसल्यास आवश्यकतेनुसार दुसऱ्या, तिसऱ्या अशी क्रमश: पसंतीची मते मोजण्यात येतील.
आज #नागपूर येथील विभागीय क्रीडा संकुलात पदवीधर पदवीधर मतदार संघातील मतमोजणीला सकाळी 8 वाजता सुरुवात झाली.सुरवातीला टपाली मतमोजणी करण्यात येत आहे तत्पूर्वी सकाळी 8 वाजता विभागीय आयुक्त डॉ.संजीवकुमार यांनी मतमोजणीच्या गोपनीयतेची सूचना सर्वांना दिली.




नागपूर विभागीय पदवीधर निवडणुकित 19 उमेदवार रिंगणात आहेत.64.38 टक्के एवढे मतदान झाले आहे.

नागपूर विभागीय पदवीधर निवडणुकीसाठी आज मानकापूर विभागीय क्रीडा संकुलात मतमोजणी प्रक्रियेस सुरुवात झाली. सुरुवातीला टपाली मतदानाला सुरुवात करण्यात आली.



आजच्या मतमोजणीची सुरवात होतांना पदवीधर निवडणुकीसाठी निरीक्षक एस वी श्रीनिवास व विभागीय आयुक्त डॉ.संजीवकुमार विभागातील सहा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी उपस्थित आहेत.



आजच्या मतमोजणी प्रक्रियेत 4 हॉलमध्ये प्रत्येकी सात अशा एकूण 28 टेबलवर मतमोजणी करण्यात येत आहे. प्रत्येक टेबलवर काऊंटीग सुपरव्हायजर म्हणून एक उपविभागीय किंवा उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी कार्यरत असून मदतनीस म्हणून 2 तहसीलदार व १ लिपिक कार्यरत आहे. सध्या टपाली मतमोजणी सुरू आहे

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.