चांप्यात सरपंच करतोय पाणी पुरवठयाचे काम
शिक्षित आणि बदल करण्याची उमेद घेऊन परिवर्तनाची काठी हाती घेऊन निघालेले तरुण काय करू शकतात, याची अनेक उदाहरणे आहेत.
उमरेड तालुक्यातील चांपा ग्रामपंचायतचे पाणी पुरवठा कर्मचारी आजारी असल्यामुळे त्यांची प्रकृती खालवली असल्याने गावात पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांनी एका महिन्याच्या जवळपास सुट्टी घेतली असता त्यांच्या प्रकृती बरी नसल्याने ग्रामपंचायतने एकवीस दिवसांची सुट्टी मंजूर केली .गावात पाणी पुरवठा करण्याचे काम एकालाही जमत नसल्यामुळे जवळपास पाणी पुरवठा करण्याचे काम करण्यास एकही मजूर मिळत नसल्याने गावभर तीव्र पाणी टंचाई ची समस्या उद्भवली , गावात पाणी पुरवठा करण्यासाठी सरपंचांनी माणसाचा शोध घेतला असता अखेर गावात पाणी पुरवठा करण्यासाठी एकही मजूर मिळत नसल्याने स्वतः उच्च शिक्षित सरपंच अतिश पवार करतोय गावात पाणी पुरवठ्याचे काम सरपंचाच गावं चांपा.