प्रेयसीची छेड काढली म्हणून मोठ्या भावाने केली होती भावाची हत्या
चंद्रपूर - जिल्हा कारागृहात 26 डिसेंम्बरला एका कैद्यांने आत्महत्या केल्याने कारागृह प्रशासन हादरून गेले आहे. आत्महत्या करणार 302 च्या गुन्ह्यात होता बंदी, त्याने कारागृहातच गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करणाऱ्यांचे नाव अंकित रामटेके त्याच्यावर स्वतःच्या भावाचा खून केल्याचा आरोप होता.
टीव्ही वाहिन्यांवरील गुन्हे विषयक मालिका बघून या खुनाचा कट रचण्यात आला. आपल्या प्रेयसीची छेड काढली म्हणून सख्ख्या भावाचा काटा काढण्याचे अंकितने ठरवले.
प्रेयसीची छेड काढली म्हणून मोठ्या भावाकडून लहान भावाची हत्या केली. ही धक्कादायक घटना जुलै महिन्यात चंद्रपूर शहराजवळच्या दुर्गापूर परिसरात घडली होती. हत्येनंतर मृतदेह पुरल्याचंही समोर आले. आरोपी अंकित रामटेके याला पोलिसांनी ताब्यात घेतले. भावाने प्रेयसीची छेड काढली या रागातून अंकितने हे कृत्य केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दुर्गापूरच्या वेताळ चौक भागात उघडकीस आलेली रामटेके कुटुंबातील दोन सख्ख्या भावांची दुर्दैवी कहाणी फिल्मी स्टाईल हत्येचा नमुना ठरली. सत्यवान रामटेके यांच्या पडक्या घरात दुर्गंधी येत असल्याची माहिती नागरिकांनी स्थानिक पोलीस ठाण्याला दिली. जमिनीतून एक मानवी हात बाहेर आला असल्याची माहिती मिळताच दुर्गापूर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. या भागात 10 ते 12 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या अनिकेत रामटेके या 17 वर्षीय मुलाचा हा मृतदेह असून त्यांची हत्या झाल्याचं काही वेळात निष्पन्न झाले. पोलिसांनी या हत्येमागे कोण असावे याचा शोध सुरु केला त्यावेळी रामटेके यांच्या घरातील 21 वर्षीय मोठा मुलगा अंकित बेपत्ता असल्याचे उघड झाले. एकीकडे अनिकेत बेपत्ता असल्याची पोलिसात असलेली तक्रार आणि दुसरीकडे पुरलेला मृतदेह सापडताच बेपत्ता झालेला सख्खा मोठा भाऊ यामुळे पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी तातडीने खबऱ्यांना अॅक्टिव्ह केलं. त्यानंतर एका शेतात लपून बसलेल्या अंकित रामटेके याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याने दिलेल्या कबुली जबाबात आपणच आपल्या सख्ख्या लहान भावाचा खून केल्याची माहिती दिली. टीव्ही वाहिन्यांवरील गुन्हे विषयक मालिका बघून या खुनाचा कट रचण्यात आला. आपल्या प्रेयसीची छेड काढली म्हणून सख्ख्या भावाचा काटा काढण्याचे अंकितने ठरवले. त्यानुसार सत्यवान रामटेके यांच्या पडक्या घरात आरोपीने सख्ख्या भावाला दारू पाजली आणि त्याचा गळा आवळून खून करत प्रेत पुरले. प्रेत लवकर कुजावे यासाठी युरिया आणि इतर साहित्य देखील या खड्ड्यात टाकण्यात आले होते. एवढेच नव्हे तर आरोपी अंकीत याने एक कुत्रा मारून तोही याच घटनास्थळी फेकला. ज्यामुळे दुर्गंधी विषयी लोकांची दिशाभूल झाली.
मात्र मुसळधार पावसाने माती वाहून गेली आणि 15 दिवसांनी हा बनाव उजेडात आला. पोलिसांना घटनास्थळी शव कुजण्यासाठी आवश्यक साहित्यासह डांबर गोळ्याही आढळून आल्या. हा खड्डा मृतक आणि आरोपी यांनी मिळून अवैध दारू विक्रीसाठीच्या बाटल्या लपवण्यासाठी खोदून तयार केला असल्याचाही खुलासा आरोपीने केला होता. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. 24 तासात या हत्या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले. हा आरोपी मागील पाच महिन्यांपासून जिल्हा मध्यवर्ती कारागृहात होता मात्र त्यांनी आज अचानक आत्महत्या केल्याने कारागृह प्रशासन हादरून निघाले आहे.