Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, डिसेंबर ०८, २०२०

गृहमंत्र्यांनी 24 वर्षांपूर्वी दत्तक घेतलेल्या अनाथ वर्षाचा येत्या 20 तारखेला विवाह



नागपूर/ प्रतिनिधी
२४ वर्षांपूर्वी रेल्वे स्टेशनवर मिळालेल्या वर्षा नावाच्या अनाथ मुलीला दिव्यांग आणि अनाथ मुलांचे आश्रयदाते श्री.शंकरबाबा पापळकर यांनी आपल्या आश्रमात दाखल केले होते. अनिल देशमुख हे शंकरबाबांच्या आश्रमात भेट द्यायचो तेव्हा वर्षाला दत्तक घेतले. येत्या २० तारखेला नागपूर येथे वर्षाप्रमाणेच मुंबईच्या स्टेशनवर मिळालेल्या एका मुलासोबतच तिचा विवाह करण्याचे आयोजिले आहे. ते स्वतः वर्षाचे कन्यादान करणार आहे. यानिमित्ताने राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शंकरबाबा पापळकर यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना या विवाहाचे निमंत्रण दिले.


दिवंगत अंबादासपंत वैद्य मतिमंद मूकबधिर बेवारस बालगृहात शिकलेली मूकबधिर मुलगी वर्षा हिचा याच बालगृहातील मुलगा समीर याच्यासोबत विवाह ठरला आहे. या मुलीचे कन्यादान गृहमंत्री अनिल देशमुख यांनी करावी असा प्रस्ताव ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शंकरबाबा पापळकर यांनी ठेवला. गृहमंत्र्यांनी पापळकर यांचा प्रस्ताव लागलीच स्वीकारत वर्षा हिचे कन्यादान करण्यास मान्यता दिली. गृहमंत्री देशमुख पुढे असेही म्हणाले की, हे कन्यादान नागपूर येथे केले जाईल. जानेवारीत वर्षा आणि समीर यांचे साक्षगंध होत असल्याचे सांगून त्यांनी संभाव्य वर वधूंला पुष्पहार घातले. या वेळी त्यांनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शंकरबाबा पापळकर यांच्याविषयी कौतुगोद्गार काढले. शक्य झाले तर कन्यादानावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनाही उपस्थित राहतील, असे देशमुख म्हणाले.




नागपूरात सापङली होती वर्षा
दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख कन्यादान करणार असलेली मुलगी वर्षा ही आता २४ वर्षांची आहे. नागपूर येथील रेल्वेस्थानकावर अवघ्या एक दिवसाचे नवजात बालक असलेली वर्षा आढळून आली होती.

शिर्ङीत सापङला समीर
तर समीर हा शिर्डी येथे सापडला होता. दरम्यान, न्यायालयाच्या मध्यमातून दोघांचेही संगोपन वझ्झरच्या बालसुधारगृहात झाले. दरम्यान, दिव्यांग, मतिमंद मुलांना 18 वर्षांपर्यंत बालगृहात ठेवण्याचा कायदा आहे. परंतू, 18 वर्षांनंतर पुढे त्यांचे काय करायचे त्यांना कोठे ठेवायचे याबबत आपल्या देशात कायदाच नाही. त्यामुळे हा कायदा करण्याबाबत शंकरबाबा पापळकर गेली अनेक वर्षे प्रयत्न करत आहेत. सामाजिक न्यायमंत्र्यांशी चर्चा करुन पापळकर यांच्या प्रयत्नांना यश मिळवून देण्यासाठी प्रयत्न करु असे अश्वासनही अनिल देशमुख यांनी या वेळी दिले होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.