Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, नोव्हेंबर १९, २०२०

पाच लाखाच्या बिबट कातङ्यासह तीन आरोपींना अटक




नवेगावबांध पोलिसांची कारवाई

वनविभागाकडे पुढील तपास





संजीव बडोले,प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.19 नोव्हेंबर:-
बिबट वाघाचे कातडे विकण्याच्या तयारीत असणाऱ्या तीन आरोपींना नवेगावबांध पोलिसांनी दिनांक 18 नोव्हेंबर ला उशिरा रात्री अटक केली. अप्पर पोलीस अधिक्षक गोंदिया कॅम्प देवरी अतुल कुलकर्णी यांना गुप्त बातमीदाराकडून काही लोक हे बिबट्या वाघाची कातडी पाच लाख रुपयात विक्री करण्यासाठी भंडारा जिल्ह्यातील सानगडी येथून भिवखिडकी शिवारात आलेले आहेत. अशी माहिती मिळाली. या माहितीची खात्री करून नवेगावबांध पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांनी एक पथक तयार करून छापा टाकुन पोलिसांनी एक डमी ग्राहक तयार करून बिबट्या वाघाची कातडी पाच लाख रुपयांत खरेदी करण्याची बोलणी केली. त्यानंतर आरोपींनी भिवखिडकी शिवारातील लांजेवार राईस मिल जवळील एका शेतात तीन इसमांनी बिबट्या वाघाची कातडी, काळीज, गुडघा, दात, पंजे हे अवयव स्वतःजवळ विक्री करण्याच्या उद्देशाने लपवून ठेवले होते. खरेदीची बोलणी झाल्यावर पोलिसांनी छापा टाकून तीन आरोपींना अटक केली. अटक केलेले आरोपी देविदास दागो मरस्कोल्हे (वय 52 वर्षे) राहणार झाडगाव जिल्हा भंडारा, मंगेश केशव गायधने (वय 44 वर्षे) राहणार पोहरा तालुका लाखणी, रजनीश पुरुषोत्तम पोगडे (वय 32 वर्षे) रा. सानगडी तालुका साकोली सर्व जिल्हा भंडारा या तीन आरोपींना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातील बिबट कातडे व अवयव घटनास्थळी पंचनामा करून जप्त करण्यात आली आहेत. सदर प्रकरण पोलिसांनी वनपरिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक या कार्यालयाकडे सोपविले आहे. या तिन्ही आरोपींवर वन्य प्राणी संरक्षण अधिनियम 1972 व भारतीय वन अधिनियम 1927 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तीन आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेऊन सहाय्यक वनसंरक्षक व प्रकाषष्ठ निष्कासन अधिकारी दादा राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली परिवीक्षाधिन वनाधिकारी अग्रिम सैनी (भारतीय वनसेवा), वनपरिक्षेत्राधिकारी रोशन दोनोडे,वनरक्षक मिथुन चव्हाण , विशाल बोराडे पुढील चौकशी करीत आहेत.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक गोंदिया विश्व पानसरे ,अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी कॅम्प देवरी, उपविभागीय पोलिस अधिकारी जालिंदर नालकुल देवरी यांच्या मार्गदर्शनाखाली, नवेगावबांध पोलीस ठाण्याचे ठाणेदार पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे ,पोलीस उपनिरीक्षक नरेश उरकुडे, सी 60 पथक काटेंगे, पोलीस हवालदार कोडापे, पोलीस शिपाई लांडगे, मडावी, चांदेवार, कोरे, देशमुख, पोलीस हवालदार भोगारे, पोलीस नायक मस्के, डहारे, दीपक क्षीरसागर, डोंगरवार ,बर्वे, चालक पोलीस नाईक कोकोडे, पोलीस हवालदार सोनवणे यांनी केली.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.