Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, नोव्हेंबर ०२, २०२०

पदवीधर निवडणुक- -1 डिसेंबरला मतदान, 3 ला मतमोजणी


- 5 नोव्हेंबरपासून नामांकन अर्ज
नागपूर-  कोरोनामुळे लांबणीवर पडलेली राज्यातील पाच पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांची निवडणूक येत्या 1 डिसेंबरला होणार असून, त्यासाठी 5 नोव्हेंबरपासून नामांकन अर्ज भरता येणार आहेत.




नागपूरसह औरंगाबाद, पुणे या पदवीधर तर अमरावती आणि पुणे विभागातील शिक्षक मतदारसंघाची मुदत 19 जुलै रोजी संपली. त्यामुळे या मतदारसंघातून विधानपरिषदेवर निवडून गेलेले सदस्य सर्वश्री सतीश चव्हाण, चंद्रकांत दादा पाटील, प्रा. अनिल सोले, श्रीकांत देशपांडे, दत्तात्रय सावंत यांचा कार्यकाळ जुलै महिन्यातच संपला होता. विशेष म्हणजे चंद्रकांत दादा पाटील हे विधानसभेवर निवडून गेलेले आहेत. राज्यात भाजप पुढचे आव्हान वाढणार आहे.

कारण शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तीन्ही पक्ष एकत्र आल्याने समीकरणे बदलली आहेत. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण, नागपूर पदवीधर मतदारसंघाचे आमदार अनिल सोले, अमरावती शिक्षक मतदारसंघाचे आमदार श्रीकांत देशपांडे आणि पुणे शिक्षक मतदार संघाचे आमदार दत्तात्रय सावंत यांना पुन्हा उमेदवारी मिळणार का? याकडे कार्यकर्त्याचे लक्ष लागलेले आहे.

दुसरीकडे पुणे पदवीधर मतदारसंघाचे तत्कालिन आमदार चंद्रकांत पाटील हे कोथरूड मतदारसंघातून विधानसभेत निवडून गेल्याने ही जागा देखील रिक्त झाली होती.

कोरोनाच्या संसर्गामुळे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लांबणीवर पडलेली होती. नोव्हेंबर 2019 महिन्यातच पदवीधर, शिक्षकांची नोंदणी करण्यात आली होती. सध्या कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याने राज्य निवडणूक आयोगाने तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघाची निवडणूक घोषित केली. या निवडणुकीसाठी 5 नोव्हेंबला अधिसूचना जारी होणार आहे. म्हणजे 5 नोव्हेंबरपासून इच्छुकांकडून नामांकन अर्ज स्वीकारण्यात येतील. 12 नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. 13 नोव्हेंबरला अर्जाची छाननी करण्यात येईल. 17 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येईल. उमेदवाराला प्रचार आणि बैठकांसाठी 13 दिवस मिळणार आहेत. 1 डिसेंबरला सकाळी 8 वाजतापासून ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान होईल. 3 डिसेंबरला मतमोजणी होईल.


निवडणूक आयोगाचे मार्गदर्शक तत्वे -डॉ. संजीवकुमार
विधानपरिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील रिक्त 5 जागांसाठी निवडणूक आयोगाने वेळापत्रक जाहीर केले आहे. मात्र, कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी तो संपला नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाने मार्गदर्शक तत्वे जारी केले आहेत. प्रत्येक मतदारांना मुखच्छादन वापरणे बंधनकारक राहणार आहे. प्रत्येक मतदारांची थर्मल स्कॅनिंग होईल. प्रत्येक मतदान केंद्रावर निर्जंतुकीकरण द्रवाची व्यवस्था करावी लागेल. तसेच मतदानादरम्यान भौतिक दुरत्व पाळण्याचे आदेश आहेत. या निवडणुकीची अधिसूचना 5 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार असून 12 नोव्हेंबर पर्यंत अर्ज स्वीकृती होणार आहे. प्राप्त अर्जांची छाननी 13 नोव्हेंबरला तर अर्ज मागे घेण्याची मुदत 17 नोव्हेंबरपर्यंत असणार आहे. 1 डिसेंबरला मतदान तर 3 डिसेंबरला मतमोजणी होईल, अशी माहिती नागपूर पदवीधर मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार यांनी दिली.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.