-साहित्यकृतींवर आधारित चर्चासत्राचा समारोप
नागपूर- कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या भारतीय धर्म, तत्त्वज्ञान तथा संस्कृती संकायाचे अधिष्ठाता व संस्कृत महाकवी प्रो. मधुसूदन पेन्ना यांना ‘प्रज्ञाचाक्षुषम’ या संस्कृत महाकाव्याकरिता साहित्य अकादमीसह विविध पुरस्कार मिळाले. या पुरस्कारांच्या गौरवार्थ कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचा भारतीय दर्शन विभाग आणि सन्निधी पूर्वछात्रा संघटनेच्या संयुक्त विद्यमाने प्रो. मधुसूदन पेन्ना यांच्या साहित्यकृतींवर आधारित सहादिवसीय ‘मधुभारती राष्ट्रीय चर्चासत्रा’ चे आयोजन नुकतेच करण्यात आले. समारोपप्रसंगी अध्यक्षस्थानी विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्रो. श्रीनिवास वरखेडी यांनी भूषविले. प्रो. मधुसूदन पेन्ना यांना आशीर्वचन देण्यासाठी संस्कृत विदुषी आणि संस्कृत भवितव्यम् साप्ताहिकाच्या संपादिका आचार्या लीना रस्तोगी उपस्थित होत्या. प्रमुख अतिथी म्हणून संस्कृती भारतीचे प्रांतअध्यक्ष रमेश मंत्री,अधिष्ठाता प्रो. नंदा पुरी, प्रो. कृष्णकुमार पाण्डेय, कुलसचिव प्रो. विजयकुमार, प्रो. कविता होले, डॉ. उमेश शिवहरे यांची विशेष उपस्थिती होती.
‘मधुभारती’’ उपाधीने प्रदान करुन कुलगुरू प्रो. श्रीनिवास वरखेडी यांच्या शुभहस्ते प्रो. मधुसूदन पेन्ना यांचा शाल, श्रीफळ, चंदनहार, सरस्वतीमूर्ती व सन्मानपत्र देवून सत्कार करण्यात आला. तसेच विश्वविद्यालयातर्फे ‘‘मधुभारती’’ उपाधी देवून सन्मानित करण्यात आले. सन्मानपत्राचे वाचन डॉ. हरेकृष्ण अगस्ती यांनी केले. याप्रसंगी प्रो. पेन्ना यांच्या समग‘ साहित्यसंपदेची माहिती असलेले ‘‘मधुभारती’’ चे प्रकाशन करण्यात आले.
कार्यक‘माचा प्रारंभ प्रा. अमित भार्गव यांच्या वैदिक मंत्राघोषाने झाला. प्रा. श्रद्धा उपाध्ये यांनी प्रो. पेन्ना विरचित मंगलाचरण सुरेल स्वरात सादर केले. प्रास्ताविक भारतीय द-रु39र्यान विभाग प्रमुख आणि मधुभारती संयोजक डॉ. कलापिनी अगस्ती यांनी केले. मधुभारती राष्ट्रीय चर्चासत्राचे समालोचन समन्वयक डॉ. रेणुका बोकारे यांनी सादर केले. प्रो. पेन्ना यांच्याबद्दल त्यांचे सहकारी असणारे प्रो. नंदा पुरी, प्रो. विजयकुमार, प्रो. कृष्णकुमार पाण्डेय, प्रो. कविता होले, डॉ. शारदा गाडगे यांनी तसेच त्यांच्या विद्यार्थ्यांनी भावना व्यक्त केल्या.
SHARE THIS