इको-प्रो तर्फे जुनोना तलाव येथे ‘पक्षी निरीक्षण
जुनोना तलावास प्रतिक्षा स्थंलारित पक्ष्यांची
पक्षी सप्ताह निमीत्त आयोजन
चंद्रपूरः महाराष्ट्र वनविभाग तर्फे 5 ते 12 नोंव्हेबर हा पक्षि सप्ताह म्हणुन साजरा करण्यात येत आहे. इको-प्रो पक्षी संरक्षण विभाग तर्फे पक्षी सप्ताह निमीत्त जुनोना तलाव परिसरात पक्षी निरीक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
आज जुनोना तलाव परिसरात सकाळी सहा वाजता पक्षी निरीक्षणासाठी इको-प्रो सदस्य व स्थानिक पक्षिप्रेेमी पोहचले. या पक्षि निरीक्षण कार्यक्रमाकरीता संस्थेचे अध्यक्ष बंडु धोतरे, चंद्रपूर महानगरपालीका आयुक्त राजेश मोहीते सहभागी झाले होते. इको-प्रो पक्षी विभाग प्रमुख बंडु दुधे, उपप्रमुख हरीश मेश्राम तर मेघशाम पेटकुले, अघ्यक्ष संयुक्त वनव्यवस्थापन समीती, जुनोना, सुभाष टिकेदार, सदस्य, जुनोना ग्रामपंचायत सहभागी झाले होते, यावेळी पक्षी सप्ताह निमीत्त उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.
चंद्रपूर येथे इको-प्रो संस्था तर्फे पक्षी सप्ताह साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यानिमीत्त पक्षी निरीक्षण, पक्षी अधिवास तलाव परिसर स्वच्छता, तलाव फेरी, जनजागृती कार्यक्रम व विवीध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आज इको-प्रो सदस्यांसोबत जुनोना तलाव परिसरात पक्षी निरीक्षण करण्यात आले. यंदा अजुनही स्थंलातरीत पक्षी जुनोना तलाव येथे आलेले नाहीत. जुनोना तलाव परिसर मध्ये आढळणारे स्थानिक पक्षी या कार्यक्रम अंतर्गत दिसुन आले. यात लेसर विसलिंग डक, काॅटन टेल, रिव्हरटर्न, लिटील ग्रेव्ह, किंगफिशर, ओपनबिल स्टाॅर्क, ग्रे हेराॅन, पांड हेराॅन, वेगटेल, कारमोरंट, रेड वॅटलेड लॅपवींग, जंगल बॅबलर, ग्रिन बी-इटर, ब्लॅक ड्रोंगो, काॅमन मैना, ब्लॅक हेडेड मैना, स्पाॅटेड आॅउल, कॅटल इग्रेट, मेडीयन इग्रेट, लिटील इग्रेट, काॅटन टिल, ब्रांज विंग जकाना, फिंसट टेल जकाना, जंगल आॅउलेट, पर्पल मुरहेन, काॅमन स्वॅलो, पाईड किंगफिशर, फलाॅयकॅचर या पक्ष्यांचा समावेश होता.
आजच्या कार्यक्रमात इको-प्रो संस्थेचे धर्मेद्र लुनावत, मनीष गांवडे, सुधिर देव, अमोल उट्टलवार, सचिन धोतरे, राजु काहीलकर, सचिन भांदककर, वैभव मडावी, मनिषा जयस्वाल, प्रगती मार्कण्डवार, चित्राक्ष धोतरे, राममीलन सोनकर, मेघशाम पेटकुले, सुभाष टिकेदार, आकाश घोडमारे आदी सदस्य सहभागी झाले होते.