नागपूर - महाराष्ट्र राज्याचे दुसरे मुख्यमंत्री, स्वातंत्र्य संग्राम सैनिक, बहुजन नायक व विदर्भ पुत्र मा. सा. उपाख्य दादासाहेब कन्नमवार यांना आज (ता. 24) 57 व्या पुण्यतिथीनिमित्त विधानसभा प्रांगणात अभिवादन करण्यात आले.
संयुक्त महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री म्हणून दादासाहेब कन्नमवार यांनी तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या सोबत काम करुन महाराष्ट्राची भक्कम उभारणी केली. सी. पी अॅन्ड बेरार प्रांतात दादासाहेब कन्नमवार यांनी विविध राजकीय जबाबदारी पार पाडून आयुध निर्माणी, आशिया खंडातील मोठे रुग्णालय, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून दादासाहेबांनी वृक्षचळवळ, भारत चीन युध्दाच्या वेळी सैनिकांचे मनोबल वाढत त्यांच्या साठी स्वतःची सुवर्णतुला करीत ही मदत सैनिकांना दिली यासारख्या अनेक निर्णय घेऊन महाराष्ट्र उभा केला. नागपूर विधानभवन प्रांगणात असलेल्या पुर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी क्रिडामंत्री ना. सुनील केदार, माजी अर्थराज्यमंत्री राजेंद्र मुळक, रोटी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ रोहित माडेवार, माजी आमदार प्रकाश गजभिये, बेलदार समाज संघर्ष समितीचे अध्यक्ष राजेंद्र बढिये, शिक्षक नेते मिलिंद वानखेडे, संघर्ष वाहिनीचे संघटक दिनानाथ वाघमारे, विदर्भ प्राथमिक शिक्षक संघाचे सचिव खिमेश बढिये, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधिक्षक प्रकाश कांचनवार, श्रीमती रजनी बढिये, सौ अर्चना कोटेवार, सामाजिक न्याय विभागाचे अधिक्षक दिनेश गेटमे, संघर्ष वाहिनीचे संघटक मुकुंद अडेवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष सुदाम राठोड, डॉ सुभाष बोर्डेकर, विनोद आकुलवार, काॅगेस कमेटीचे माजी जिल्हाध्यक्ष नाना गावंडे, अॅड रविंद्र ढोले, रविंद्र बंडीवार, सुबोध जंगम, विकास कांबळे, अजय वाघ, मुख्याध्यापक प्रदिप केचे उपस्थित होते.