राजुरा / प्रतिनिधी
दिनांक १२/११/२०२०
राजुरा तालुक्यातील सातरी येथे श्रमिक एल्गार चे उपाध्यक्ष घनशाम मेश्राम यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले. कोरोना चे महामारित शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी नुकताच श्रमिक एल्गार संघटनेने राजुरा तालुक्यातील गावागावात एल्गार अभ्यासिका वर्ग शुरू केले आहे.
सातारी येथे मयुरी करमनकर या युवतीने पुढाकार घेऊन गावात एल्गार अभ्यासिका वर्ग शुरू केले असून दिनांक ११/११/२०२९ ला शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम घेण्यात आला असून बुक, पेन, रंग कांडी, मास्क, सेनिटायझर या वस्तुंचा प्रामुख्याने समावेश होता.
यावेळी उपाध्यक्ष मेश्राम, तसेच राजुरा येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाचे शिक्षक तथा श्रमिक एल्गार चे कार्यकर्ते एल. टी. मडावी यांनी मुलांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात सातरी येथील पालक रोशनी मून, सुरेखा तेलसे, मीना पलाश्या, त्रिवेंद्र वाघमारे, सिद्धार्थ वाघमारे, अशोक चकोर, व विध्यार्थी उपस्थित होते.