इको-प्रो तर्फे पक्षी सप्ताह निमीत्त विविध उपक्रमासह, शालेय निबंध व चित्रकला स्पर्धेचे आयोजन
चंद्रपूरः यंदापासुन महाराष्ट्र वनविभाग तर्फे 5 ते 12 नोव्हे हा 'पक्षि सप्ताह' म्हणुन साजरा करण्यात येत आहे. सदर पक्षी सप्ताह साजरा करण्याबाबत 'पक्षी सप्ताह' घोषीत करणारा शासन निर्णय शासनाने नुकतेच काढलेला आहे. त्यानुसार चंद्रपूर येथे सुद्धा इको-प्रो संस्था आपल्या स्तरावर पक्षी सप्ताह निमीत्त पक्षी निरीक्षण, पक्षी अधिवास तलाव परिसर स्वच्छता, तलाव फेरी, जनजागृती कार्यक्रम व शालेय विद्यार्थी करिता चित्रकला व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
मागील वर्षी चंद्रपूर शहरात इको-प्रो संस्थेच्या वतीने "विदर्भ पक्षीमित्र संमेलनाचे" यशस्वी आयोजन करण्यात आलेले होते. महाराष्ट्रात पक्षीमीत्रांची मोठी चळवळ आहे. पक्षी संरक्षण व त्याचे अधिवास संरक्षणासाठी बरीच प्रयत्न केले जात आहे. याचाच एक भाग म्हणुन महाराष्ट्र राज्य हे आता पक्षि सप्ताह साजरा करणारे पहीले राज्य ठरलेले आहे. सदर पक्षी सप्ताह भारतीय पक्षीविश्व व पक्षीअभ्यासशास्त्रास जागतिक स्तरावर पोहचविनारे पद्मभूषण स्व. डाॅ सलिम अली व महाराष्ट्रातील वन-वन्यजीव विषयक साहित्य निर्मिती करणारे निवृत्त वनाधिकारी श्री. मारूती चितमपल्ली यांच्या वाढदिवस लक्षात घेउन ठरविण्यात आलेले आहे. या पक्षि सप्ताह चे महत्व, पक्ष्याचे एंकदरीत जैवविवीधतेतील महत्व सर्वाना माहीती व्हावी, व्यापक जनजागृती व्हावी तसेच राज्यातील पक्ष्याचे महत्व प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहचवून त्यांचे संरक्षणाप्रती जवाबदारी स्पष्ट व्हावी म्हणुन इको-प्रो तर्फे हा पक्षी सप्ताह विविध उपक्रम घेऊन शहर व जिल्ह्यात साजरा करण्यात येत आहे.
इको-प्रो तर्फे शालेय विदयार्थीकरीता निबंध व चित्रकला स्पर्धाचे आयोजन करण्यात आलेले आहे. दोन्ही स्पर्धा करीता यात दोन गट असुन ‘अ’ गटात 5 ते 7 वी तर ‘ब’ गटात 8 ते 10 पर्यतचे विदयार्थी सहभाग घेउ शकतील. ‘अ’ गट करीता निबंध विषय ‘माझा आवडता पक्षी ’ तर चित्रकला विषय: ‘माझ्या अंगणातील पक्षी’ असेल ब गट करीता निबंध विषयः ‘पक्षी संरक्षणाची गरज’ चित्रकला विषय: ‘पक्षी व पक्षी अधिवास संरक्षण’ असणार आहे. सर्व प्रवेशीका विदयार्थी आपले नाव, वर्ग, शाळेचे नाव व मोबाईल क्रमांक लिहुन गंजवार्ड, रामाला तलाव नजीकच्या 'इको-प्रो' कार्यालयात 8 नोव्हे पर्यंत जमा करू शकतील किंवा आपल्या नजीकच्या इको-प्रो सदस्यांकडे जमा करू शकतील.
*‘अ’ गट 5 ते 7 वी*
निबंध: ‘माझा आवडता पक्षी’
चित्रकला: ‘माझ्या अंगणातील पक्षी’
*‘ब’ गट 8 ते 10*
निबंध: ‘पक्षी संरक्षणाची गरज’
चित्रकला: ‘पक्षी व पक्षी अधिवास संरक्षण’