तीन आठवड्यात मोठा आकडा
एकूण 1315 रुग्ण 37 मृत
तालुका प्रतिनिधी
काटोल: तालुक्यात शुक्रवारला उच्चांक गाठला असून 17 पॉझिटिव्ह केस मिळाले आहे. काटोल शहरात संचिती नगर मध्ये एकाच परिवारातील पाच केस पॉझिटिव्ह सापडले. ग्रामीण भागात वंडली सावरकर 1, मोहखेडी1, रिधोरा 3 व सुबकुंड 2 असे आत 7 ग्रामीण सापडल्याने एकूण 17 पॉझिटिव्ह आकडा तीन आठवड्यातील सर्वात मोठी संख्या ठरली आहे. तालुक्यात मृताचे प्रमाण 36 वर पोहचले असून एकूण 1315 पॉझिटिव्ह केस ची नोंद आहे .