महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री राजसाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन उत्तर विधानसभा क्षेत्र, नागपूर येथील प्रभाग ६ व प्रभाग१ व ४ मधील अनेक युवकांनी मनसे प्रदेश सरचिटणीस श्री हेमंत गडकरी व शहर अध्यक्ष श्री. अजय ढोके आणि जिल्हा सचिव श्री. मनोज गुप्ता यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश घेतला.यावेळी प्रामुख्याने उत्तर नागपुरातील युवा सामाजिक कार्यकर्ते हाफिज अन्सारी, बबलू गायकवाड, शैलेश गुप्ता, सेवानिवृत्त रेल्वे लोहमार्ग पोलिस अधिकारी प्रभाकर वाडेकर यांचे पुष्पगुच्छ व मनसेचा ध्वज देऊन स्वागत करण्यात आले. उत्तर विधानसभा विभाग अध्यक्ष उमेश बोरकर, विभाग सचिव महेश माने, विभाग उपाध्यक्ष लाला ससाणे, मोहित देसाई व अन्य प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
सद्यपरिस्थितीत महाराष्ट्रातील जनतेचे एकमेव आशास्थान श्री. राजसाहेब ठाकरे हेच आहे. विविध क्षेत्रातील जनता मोठ्या आशेने आपल्या समस्या त्यांच्याकडे घेऊन येत असतात कारण त्यांना या ठिकाणी न्याय मिळेल याची अपेक्षा असते व ती पूर्ण होतांना महाराष्ट्रातील जनतेने बघितलेच आहे. मनसेत प्रवेश घेणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी आपल्या विभागात निष्ठेने जनतेची कामे करावी व राजसाहेबांचा आदर्श बाळगावा असे मार्गदर्शन श्री हेमंत गडकरी यांनी प्रवेशप्रसंगी उपस्थित नवोदितांना केले.
प्रभाग ६ मधील नफिज अहमद, मोहम्मद रफीक, मोहम्मद शाहिद, सय्यद सरफराजअली, अशर्फीलाल प्रजापती, मोहम्मद फैयाज, इब्राहिम अन्सारी,अमित टंडन, शाहबाज काझी, अशफाक खान, हकीमअली,तसेच प्रभाग १ व ४ मधील राजकुमार वाडेकर, अनिल सारंगपूरे, नितेश पराते, शुभम गडोले,अतुल रामटेके, किरण कावळे, मोनु तिवारी, अमित रहांगडाले, सदाफ अली, तोहिफ खान, तथागत फुले, साजन समुद्रे, सूरज वानखेडे, शैलेश क्षीरसागर, किशोर भनारे,यांचेसह अन्य युवकांनी मनसेत प्रवेश घेतला.