# गृहमंत्री यांना निवेदन दिले
काटोल : प्रतिनिधी
महाराष्ट्रात यावर्षी आगस्ट महिन्यात अति वृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाने कापूस पीक वगळून सोयाबीन , संत्रा, मोसंबी आदी पिके नुकसान भरपाईत घेतले असून सर्व्हे सुद्धा झाले आहे. प्रत्यक्षात कपासी पिकाची पेरा काटोल नरखेड तालुक्यात मोठ्या प्रमाणात असून सदर पिकाचे नुकसाना मुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे कपासी पिकांचा दोन्ही तालुक्यात सर्व्ह करून कापूस उत्पादक शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी काटोलचे माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक तानाजी थोटे यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन या भागाचे आमदार तथा गृहमंत्री यांना केली आहे.
निवेदन देते वेळी सोबत भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष काटोल लक्ष्मीकांत काकडे,भाजप कार्याध्यक्ष काटोल विजय महाजन, अनिकेत अंतुरकर, आकाश मेश्राम आदींची उपस्थिती होती.
####$#