दोन महिन्यांपासून कार्यवाहीच्या प्रतीक्षेत
मुख्यमंत्री उद्वव ठाकरे लक्ष घालणार का?
खापरखेडा-प्रतिनिधी
महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात महानिर्मिती कंपनी अंतर्गत मुख्य अभियंता पद भरती घोटाळा दोन महिन्यांपूर्वी उघडकीस आला मुख्य अभियंता पदावर नियमबाह्य नियुक्ती करण्यात आली मात्र कार्यवाही करण्यात आली नाही उलट नियमबाह्य निवड करण्यात आलेल्या मुख्य अभियंता व निवड समितीला पाठीशी घालण्यात येत आहे त्यामुळे राज्यात असलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या कार्यप्रणालीवर प्रशचिन्ह निर्माण झाले सदर घोटाळ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लक्ष घालणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
महानिर्मिती कंपनी अंतर्गत मुख्य अभियंता सरळसेवा भर्ती "२०१७" प्रक्रिया २२ में २०१७ रोजी राबविण्यात आली मात्र निवड समितीने पात्र उमेदवारांना डावलून खापरखेडा औष्णिक वीज केंद्रात कार्यरत मुख्य अभियंत्याची नियमबाह्य गुण वाढवून मुख्य अभियंता पदावर निवड केली सदर घोटाळा प्रसार माध्यमाच्या माध्यमातून दोन महिन्यांपूर्वी उघडकीस आला शिवाय माहितीच्या अधिकारातून सदर बाब उघड झाली आहे.
भारत हा लोकशाही प्रधान देश आहे या देशात न्यायव्यवस्था आहे त्यामूळे दोषींवर कार्यवाही करने अपेक्षित आहे मात्र कार्यवाही का करण्यात येत नाही त्यामूळे कळायला मार्ग नाही वादाचे केंद्रबिंदू असलेले खापरखेडा औष्णिक वीज केंद्र राज्याचे ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांच्या गृह जिल्ह्यात आहे महानिर्मिती कंपनी अंतर्गत करण्यात आलेला मुख्य अभियंता पद भरती घोटाळा डॉ नितीन राऊत यांच्या मंत्रालया अखत्यारित विषय असल्यामुळे त्यांना घोटाळ्याची परिपूर्ण माहिती आहे.
जवळपास वर्षभरा पूर्वी शिवसेनेने भाजपशी फारकत घेऊन राज्यात कांग्रेस व राष्ट्रवादी कांग्रेसच्या मदतीने महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले राज्याची जबाबदारी स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या खांद्यावर घेतली एकेकाळी विरोधी बाकावर बसणारे त्रिकुट सत्तेवर आले त्यामूळे सर्व सामान्य नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या मात्र महाविकास आघाडीच्या कार्यकाळात मुख्य अभियंता पद भरती घोटाळ्याला पाठबळ मिळत असल्याने सर्व सामान्य वर्गात नाराजीचा सूर दिसून येत आहे मात्र कार्यवाही दिसून येत नाही.
२०१७ मध्ये महानिर्मिती कंपनी मुख्य अभियंता पद भरती घोटाळा भाजपच्या कार्यकाळात झाला यावेळी ऊर्जाखात चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कडे होत जवळपास दोन अडीच वर्षानंतर मुख्य अभियंता पद भरती घोटाळा महाविकास आघाडीच्या कार्यकाळात उघडकीस आला त्यामूळे दोषींवर कार्यवाही करण्याची आयती संधी महाविकास आघाडी कडे चालून आली मात्र त्यांना संधीच सोन करता आलं नाही उलट निवडबाह्य निवड झालेल्या मुख्य अभियंता व दोषी निवड समितीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
खापरखेडा औष्णिक वीज केंद्र राज्याचे ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत व पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांच्या गृह जिल्ह्यात असून त्यांच्या गृह जिह्यात असलेल्या वीज केंद्रातील मुख्य अभियंत्यांवर त्यांची मुख्य अभियंता पदावर निवड नियमबाह्य झाल्याचा आरोप होत आहे डॉ नितीन राऊत व सुनील केदार यांची दिल्ली दरबार व राज्यात वजन आहे निष्पक्ष व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख आहे त्यामूळे मुख्य अभियंता पद भरती घोटाळा प्रकरणात दोषींवर कार्यवाही करण्याचे आदेश देतील अशी अपेक्षा राज्यातील जनतेकडून व्यक्त होत आहे.