वाढत्या कोरोनाच्या प्रादूर्भावात नागरिक कच-याच्या विळख्यात
यवतमाळ :- गेल्या अनेक महिन्यांपासून ‘कोरोना’च्या वाढत्या प्रादूर्भावामुळे रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यवतमाळ नगरपालिका स्वच्छ शहरासाठी ओळखली जाते. मात्र, याच नगरपालिकेतील अनेक भागांत प्लॅस्टिक कच-याचा प्रादूर्भाव वाढला आहे. परिणामी, घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहेत. नगरपालिकेला जणू स्वच्छतेचा विसर पडलेला आहे. त्यामुळे कुणीतरी या नगरपालिकेला त्यांच्या कर्तव्याची आठवण करून देणे गरजेचे झाले आहे. याबाबत उपाययोजना करण्याची मागणी अनेकदा नागरिकांनी केली आहे. शिवाय, या मागणीला वरिष्ठ अधिका-यांकडून केराची टोपली दाखविण्यात आली आहे.
यवतमाळ नगरपालिके अंतर्गत येत असलेल्या प्रभाग क्रमांक १७ दहिवलकर लेआउट परिसरात कच-याच्या ढिगारे साचले आहेत. या कच-यातून दुर्गंधी येत आहेत. परिणामी, नागरिकांना राहणे अवघड होऊन गेले आहेत. याशिवाय, प्रभाग क्रमांक १७मध्ये विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे आरोग्यावर परिणाम होत आहे. यवतमाळ नगरपालिका स्वच्छ शहर व शांततेसाठी ओळखली जाते. परंतु, प्रत्यक्षात मात्र या नगरपालिकेतर्फे बाबींचे धिंडवडे उडवले जात आहे. स्वच्छतेबाबत अनेकदा नगरपालिकेला लेखी निवेदने दिल्यानंतर साफसफाईकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. ‘आरोग्यम धनसंपदा’ अशी मराठीत म्हण आहे. मात्र काही ठिकाणी ही लागू होत नाही. आरोग्य चांगले राहण्यासाठी स्वच्छतेची गरज असते. याबाबत प्रशासनातर्फे वारंवार सुचनाही दिल्या जाते. मात्र, अनेकदा या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. आधीच ‘कोरोना’मुळे नागरिक दहशतीच्या वातावरणात आहेत. अशात घाणीच्या साम्राज्यातून डेंगू, मलेरिया, टायफेड, निमोनिया इत्यादी आजारांना निमंत्रण मिळते. त्यामुळे ही बाब गंभीर असून तातडिने उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. याबाबत प्रशासन मात्र गाढ झोपेचे सोंग करीत असल्याच्या प्रतिक्रीया जनसामान्यातून वर्तविले जात आहे.
तर….आंदोलन करू : जितेश नावडे
गेल्या अनेक महिन्यांपासून स्वच्छतेविषयी पालिका जागृत दिसून येत नाही. याबाबत लेखी निवेदने, तक्रारी करूनही कोणतिही उपाययोजना करण्यात आलेली नाही. कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे दररोज जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत आहेत. कच-याची विल्हेवाट न लावण्यास आंदोलन करू हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी दूसरा पर्याय नाही, अशी माहिती येथील प्रभाग क्रमांक १७ मध्ये रहिवाशी असलेले जितेश नावडे यांनी दिली.