Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, सप्टेंबर ०१, २०२०

माविमद्वारे उखाणे स्पर्धेचे आयोजन


गडचिरोली, ता. १ : उखाणा घेणे हा महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेच्या जीवनातील जिव्हाळ्याचा व
आवडीचा विषय आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. याच गोष्टीला नजरेसमोर ठेऊन कोविडच्या या निराशामय काळात महिलांचा उत्साह वाढविण्यासाठी गौरी, गणपती सणानिमित्‍त महिला बचतगटातील महिलांसाठी महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे ऑनलाईन उखाणे स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे.
ही  स्पर्धा सर्व महिलांसाठी खुली राहणार असून ज्या महिलांना या स्पर्धेत भाग घ्यावयाचा असेल त्यांनी  नाविण्यपूर्ण, जनजागृती करणारे, सामाजिक आशय असणारे तसेच काही ऐतिहासिक मूल्य असणारा, दीड ते जास्तीत जास्त तीन मिनिटांचा उखाण्याचा व्हिडीओ तयार करून महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाकडे १० सप्टेंबर २०२० पर्यंत पाठवावा.  उखाणे नाविण्यपूर्ण असावेत. त्यांचा आशय सामाजिक, ऐतिहासिक व प्रबोधनात्मक असावा, उखाणा हा मौखिक साहित्यिक प्रकार असला तरी त्यातील आशय हा फक्त प्रागतिक विचारांना पुढे नेणारा असावा, आपण सर्वसाधाणपणे आपल्या यजमानांच्या नावाभोवती उखाणे गुंफत असतो.  मात्र, या स्पर्धेत आपणाला  उखाणे समाजसुधारक,ऐतिहासिक व्यक्तीरेखा (विशेषत: स्त्री व्यक्तीरेखा) यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी असल्याने उखाणा या व्यक्तिमत्तवांच्या
भोवती गुंफणे अपेक्षित आहे, उखाणा स्त्री पुरुष समानता या मुल्यांचा पुरस्कार करणारा असावा, उखाणा कमीत कमी दीड ते जास्तीत जास्त तीन मिनिटांचा लांब असावा, उखाणा मुखोदगत (पाठ) असावा.
जिल्ह्यात प्राप्त उखाण्याची जिल्हा स्तरावर परीक्षकाकडून छाननी करून त्यापैकी पात्र माविमच्या महिलांचे ३ तर माविमेत्‍तर महिलांचे ३ क्रमांक काढून ६ व्हिडीओ विभागीयस्तरावर पाठविण्यात येतील, प्रति जिल्हा ६
याप्रमाणे साधारण एकूण ३६ पात्र व्हिडीओ एका विभागीयस्तरावर प्राप्त होतील ज्यामधून परीक्षकाकडून छाननी करून त्यापैकी पात्र माविमच्या  महिलांचे ३ क्रमांक व माविमेत्तर महिलांचे ३ क्रमांक काढून ६  व्हिडीओ मुख्यालयाकडे पाठविले जातील. ६ विभागाचे मिळून ३६ पात्र व्हिडीओ यामधून राज्यस्तरावर केवळ माविमच्या  महिलांचे ३ क्रमांक व माविमेत्‍तर महिलांचे ३ असे ६  क्रमांक काढले जातील, मात्र विभागीय स्तरावर ३६ पात्र महिलांना स्पर्धेत सहभागाबाबत प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देण्यात येईल आणि राज्यस्तरीय विजेत्या ६  महिलाना राज्य साहित्य संमेलनात उखाणा सादरीकरणासाठीची संधी देण्यात येणार आहे.  त्याकरिता माविम जिल्हा कार्यालय, गडचिरोली संपर्क क्रमांक ०७१३२२२३०२२ किंवा gadchiroli.mavim2019@gmail.com या इमेलवर संपर्क साधण्याचे आवाहन माविमचे वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी श्रीमती कांता मिश्रा यांनी कळविले आहे.  

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.