# काटोल नरखेड तालुक्यात जनावरे तपासणी
विशेष शिबिरे
# हजारो जनावरांवर उपचाराची श्रुंखला सुरू
# पंचायत समिती व कोशिश फाऊंडेशनचे उपक्रम
एकाच दिवशी चार शिबिराचे आयोजन
सुधीर बुटे/काटोल : तालुक्यात मूक प्राण्यावर लंम्पी स्किन डिसीज चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आल्याने गुरे दगावत आहे. सादर गंभीर बाबीची दखल घेत देव दूताची रूपात जी प सदस्य तथा कोशीश। फौंडेशन चे सर्वेसर्वा सलील देशमुख यांनी आज शुक्रवार पासून मूक जनावरे तपासणी व उपचार सार्वत्रिक मोहीम राबविल्याने शेतकरी व पशुपालकांना दिलासा मिळाला आहे. धडक्याचे मोहिमेत जास्त प्रादुर्भाव असणारे 4 गावामधून मोहीम राबवून हजारो बाधित जनावरांवर उपचार करण्यात यश आल्याची माहिती उज्वल भोयर यांनी दिली. महाराष्ट्रात हा रोग असला तरी असे विशेष शिबिर घेणारे काटोल विधानसभा पहिले क्षेत्र ठरले आहे हे विशेष!
काटोल तालुक्यातील कोंढाळी सर्कल मध्ये खापरी (बरोकर )व मासोद येथे तर नरखेड तालुक्यातील तिनखेडा व लोहारी सावंगा येथ शिबिरे पार पडली. शुकरवरला सकाळी आठ वाजता पासुनच पशुपालकांनी आपली जनावरे या शिबिरात आणण्यास सुरुवात केली होती. तपासणी व उपचार योग्य होत असल्याने पशु मालकांनी समाधान व्यक्त केले.शनिवारला काटोल तालुक्यातील अंबाडा व फेटरी येथे तर नरखेड तालुक्यातील बेलोना व खरसोली येथे आयोजन होणार आहे. काटोल तालुक्यातील शिबिरामध्ये ८३४ व नरखेड तालुक्यातील ९२७ जनावरांवर उपचार करण्यात आले असल्याची माहिती शिबीर संयोजक यांनी दिली. शिबिरांचे नियोजन काटोल डॉ. अनिल ठाकरे व नरखेड सतीश रेवतकर करीत आहे. पशु चिकित्सा शिबिरात पशुधन विकास अधिकारी डॉ महेंद्र चव्हाण, डॉ एच बी बानाईत, डॉ ए. पी. ब्राह्मणकर, डॉ एस. व्ही. आसुटकर, डॉ. तुषार पुंड, डॉ. एम.डी. लाडूकर यांच्यासह पशुवैद्यकीय अधिकारी व असंख्य कर्मचारी यांच्या माध्यमातून तपासणी व औषध उपचार करण्यात आले आहे. ग्रामीण भागात भव्य मूक जनावरे तपासणी मोहीम आयोजनाबद्दल स्वागत व आयोजकांचे कौतुक केले आहे.