रक्ताची भासत होती गरज मग दिली एनएसएसला हाक
नागपूर/ प्रतिनिधी
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता व नागपूर शहरात रक्ताची कमतरता पडू नये म्हणून
कोरोना महामारीच्या या काळात मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा असल्यामुळे गरजु रुग्णांना रक्त मिळत नाही. अशा या काळात तायवाडे महाविद्यालयाचा विद्यार्थी व एनएसएस स्वयंसेवक राहूल मनोहर जिभकाटे यांनी राज्य रक्त संक्रमण परिषद महाराष्ट्र राज्य (SBTC) येथील शासकीय ब्लड बॅंकेत , सोमवार रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. सक्षम अधिकारी नागपूर यांच्या उपस्थितीत यावेळी रक्तदात्यांनी कोरोना योध्दाप्रमाणे येवून उस्फुर्तपणे रक्तदान केले. या रक्तदान शिबीरामुळे गरजु रुग्णांना नक्कीच या रक्ताची मदत होईल, कारण मी नागपूरात अपघात ग्रस्त रक्षक म्हणून नेहमी काम करत असतात अपघात झाल्यानंतर रक्त किती महत्वाचे असते .असे राहूल जिभकाटे यांनी सांगितले यावेळी रासेयो स्वयंसेवक अभिषेक धुर्वे गौरव शाहू विनोद हजारे रोहीत जिभकाटे शुभम वाघमारे यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
#कोरोना_योद्धा_सन्मान प्रमाणात देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच मास्क व सॅनिटायझर देण्यात आले.यात प्रशासनाच्या सुचनांच्या आदेशानुसार चे पालन करण्यात आले .