Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, सप्टेंबर ०२, २०२०

दोन सागवान लठ्यासह १ ऑटोरिक्षा जप्त; ३ आरोपींना अटक





गङचिरोली/ प्रतिनिधी
संरक्षण व अतिक्रमण निर्मुलन पथकातील वनकर्मचारी रात्री गस्तीकरीता वनोपज तपासणी नाका, धर्मपुरी येथे उपस्थित राहुन येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनाची तपासणी करीत असतांना दिनांक 01/09/2020 रोजीच्या पहाटे 4.30 वाजताचे दरम्यान एक ऑटोरिक्शा क्रमांक AP 01/Y 1734 वनोपज तपासणी नाका, धर्मपुरी येथे आली असता, सदर ऑटोरिक्शाची वनकर्मचाऱ्यांनी तपासणी केली असता सदर ऑटोरिक्शा मध्ये 2 नग साग स्लिपाट लपवून वाहतुक करीत असल्याचे आढळुन आले.

तेव्हा सदर मालाबाबत ऑटोरिक्शा वाहन चालकाला वाहतुक परवानगी विचारणा केली असता सदर माल वाहतुकीबाबत कोणत्याही प्रकारचे वाहतुक परवाना किवा इतर कोणतेही कागदपत्र नसल्याचे सांगितले. तेव्हा ऑटोरिक्शा मध्ये बसलेले इतर 2 व्यक्तींना वाहनाखाली उतरवून वाहनाची अधिक तपासणी केली असता सदर वाहनात बोसा ब्लेडसह । नग व कुन्हाड 1 नग आढळून आले. तेव्हा त्यातील व्यक्ती नामे 1. साईकुमार राजन्ना उप्परी, वय - 18 वर्ष, 2, महेश चंद्रनायक जरपुला, वय - 20 वर्ष, व 3. मल्लेश रामन्ना आत्राम (वाहनचालक), वय - 20 वर्ष, सर्व रा. सर्वायपेठा, ता. कोटापल्ली, जि. मंचेरियाल (तेलंगाणा) यांना वनविभागाचे ताब्यात घेवून मोक्यावर मोकापंचनामा व जप्तीनामा नोंद करुन सदर मालाचे मोजमाप केले असता साग स्लिपाट 2 नग, 0.188 घनमीटर, किमत 11276/- इतके होते. सदर माल जप्त करुन आरोपींना वाहनासहीत अधिक चौकशीकरीता वनपरिक्षेत्र कार्यालय, सिरोंचा येथे आणण्यात आले. सदर बाबत वनगुन्हा क्रमांक 916/02, दि. 01/09/2020 नुसार गुन्हा नोंदविण्यात आला.
सदर घटनेची कार्यवाही मा सुमित कुमार(भाई से) उपवनसंरक्षक, सिरोंचा व मा. एस.जी.बडेकर, सहाय्यक वनसंरक्षकातेंदु), सिरोंचा यांचे मार्गदर्शनात श्री वि.वा.नरखेडकर, वनपरिक्षेत्र अधिकारी, सिरोंचा, श्री के. एस. शेख यांनी केली.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.