गडचिरोली जिल्हा दौऱ्याच्या अनुषंगाने पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज भामरागड तालुक्यातील पूरग्रस्त भागांची पाहणी दरम्यान गोसीखुर्द धरणाची हवाई पाहणी केली.
गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यामध्ये तसेच देसाईगंज वडसा व सावंगी परिसरात अतिवृष्टीमुळे अनेक घरांचे, शेतीचे तसेच पूरग्रस्त भागातील व्यावसायिकांचे नुकसान झाले आहे. या अनुषंगाने भामरागड, देसाईगंज वडसा व सावंगी या पूरग्रस्त विभागांना भेट देत आज तेथील परिस्थितीचा आढावा घेतला.
भामरागड तालुक्यातील पुराने नुकसान झालेल्या सर्व ८४०० कुटुंबांना शिवसेनेच्या वतीने जीवनावश्यक साहित्य कीट व प्रत्येकाला एकेक ब्लॅंकेट मदत म्हणून दिले जाणार असून उर्वरित नागरिकांना प्रशासनाच्या माध्यमातून साहित्य वाटप करण्यात येणार आहे.
आवश्यक मदतीबाबत प्रशासनाला सूचना देत पुरामुळे नुकसानग्रस्त शेती,घरे व इतर ठिकाणचे पंचनामे करून तात्काळ मदत देण्याचे प्रशासनाला निर्देश दिले.यासमयी जिल्हाधिकारी दीपक सिंगला, पो.अधीक्षक शैलेश बलकवडे, अति.पो.अधीक्षक अजयकुमार बंसल, सहा.जिल्हाधिकारी मनोज जिंदल,तहसीलदार उपस्थित होते.