Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, सप्टेंबर ०२, २०२०

दुचाकी चोर गजाआड, भद्रावती पोलिसांची कारवाई




शिरीष उगे(भद्रावती):
रस्त्याने येताना शौचास बसलेल्या इसमाची हिरो होंडादुचाकी पळवून नेणाऱ्या चोरट्यास भद्रावती पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने हुडकून काढून चोरट्यास बेड्या ठोकण्याची घटना नुकतीच दि.30 ऑगस्ट रोजीभद्रावती शहरात घडली.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार भद्रावती तालुक्यातील कोची (घोनाड) येथील निलेश सुरेश क्षीरसागर (25) हा युवक दि.29 ऑगस्ट रोजी हिरो होंडा स्प्लेंडर प्लस दुचाकी क्र. एम.एच.34 ए.एच.1794 ने भद्रावती-चंदनखेडा रस्त्यावरील मासळ (विसापूर) येथे आपल्या चुलत भावाला भेटायला गेला होता. भेटून परत येत असताना रस्त्यात बरांज (तांडा) गावाजवळ आपली दुचाकी उभी करून तो शौचास गेला. या संधीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने सदर दुचाकी घेऊन पोबारा केला. सर्वत्र शोध घेतला असता दुचाकी कुठेही आढळून आली नाही. याबाबत निलेश क्षीरसागर याने भद्रावती पोलिसात तक्रार दाखल केली.या तक्रारीच्या आधारे गुन्हे शोधपथकाचे प्रमुख
उपनिरीक्षक अमोल तुळजेवार यांनी तपास केला असता शुभम संजय चक्रवर्ती (25) रा. हनुमान नगर भद्रावती या चोरट्याने सदरदुचाकी चोरून नेल्याची गुप्त. माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस पथक ‘त्या’ चोरट्यापर्यंत पोहचले व त्याच्याकडून 25 हजार रुपये किंमतीची सदर हिरो होंडा स्प्लेंडर प्लस जप्त केली. त्याला अटक करून त्याच्या विरुद्ध भा.दं.वि.379 कलमान्वये गुन्हा दाखल केला. ही कारवाई ठणेदार सुनिलसिंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल तुळजेवार पोलीस शिपाई सचिन गुरनुले, हेमराज प्रधान, केशव
चिटगिरे ,निकेश ढगे यांनी केली.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.