लॉकडाऊनच्या काळात गुगल मिट द्वारे साहित्य आणि संगीत विश्वातील दिग्ग्ज मान्यवरांच्या उपस्थितीत अविस्मरणीय ऑनलाइन प्रकाशन सोहळा संपन्न झाला. दि. १५ ऑगस्ट २०२० च्या सायंकाळी मा. श्री. अशोक पत्की सर (संगीतकार ) आणि डॉ श्री.श्रीपाल सबनीस सर( 89 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्ष, पिंपरी -चिंचवड २०१५) यांच्या अध्यक्षतेखाली *"अष्टपैलू"* अष्टाक्षरी काव्यसंग्रहाचा ऑनलाइन प्रकाशन सोहळा संपन्न झाला.
मा. अशोक पत्की यांच्या वाचनात कवयित्री शामला पंडित (दीक्षित ) यांची कविता आली. आणि संपर्क साधून कवयित्री शामला पंडित (दीक्षित ) यांचे कौतुक केले.११ वा काव्यसंग्रहासाठी प्रस्तावना मा.अशोक पत्की यांनी दिली आहे. यातील सर्व ८६ कविता अष्टाक्षरी या काव्यप्रकारातील आहे. लॉक डाऊनच्या काळातील (एप्रिल २०२० ते जून २०२०) लिहिलेल्या हे काव्यसंग्रहाचे वैशिष्टय आहे. लवकरच संकट टळावे व पुढील पुस्तकाचे समक्ष प्रकाशन व्हावे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. मनोगतात "काळी माती" या कवितेचे स्वरबद्ध गायन मा. अशोक पक्ती सरांनी केले.
डॉ श्री.श्रीपाल सबनीस यांनी मनोगत व्यक्त करताना ११ व्या संग्रहाबद्दल कौतुक केले. अष्टपैलू हा संग्रह खऱ्या अर्थाने अष्टपैलू आहे. या मधील कविता विविधांगी, प्रगल्भ, विचाराला चालना देणाऱ्या, सर्वांग परिपूर्ण आहेत असे मत व्यक्त केले. कमी कालावधि मधील अविस्मरणीय कार्य असा गौरव केला.
श्री,पी. ई. कुलकर्णी साहेब ( मा. उपसचिव पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, पुणे ) ऑनलाइन प्रकाशन संकल्पना खूप आवडली. पुढील पुस्तक लवकर प्रकाशित व्हाव अशी इच्छा व्यक्त केली.
श्री. बबन पोतदार सर (ग्रामीण कथाकार, पुणे) यांनी कै. दीक्षित गुरुजींचे स्मरण केले. अनुभव कथन केले. त्यांचा वसा वारसा पुढे नेण्याचे कार्य साहित्यातून होतेय याबद्दल समाधान व्यक्त केले.
श्री. अजय बिरारी सर ( लेखक, गझलकार,अभिनेता), श्री. विजयजी सातपुते, सौ. हेमलता महामुनी, श्री. व सौ. शारदाताई कल्याण पानगे, श्री. निलेश महागावकर, श्री.गुरुनाथ कुलकर्णी सौ. स्वाती कोरगावकर या मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले . पुढील साहित्यिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास शैक्षणिक, साहित्तिक सामाजिक क्षेत्रातील नामवंत व्यक्ती उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रणाली पंडित हिने केले. आभार शामला पंडित यांनी मानले.