Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, ऑगस्ट १५, २०२०

सर्व मिळून कोरोनाविरुद्ध एकत्रित लढा देऊया : महापौर संदीप जोशी



मनपात ध्वजवंदन उत्साहात : कोरोनायोद्धांचा सत्कार

नागपूरता. १५ : - कोरोनाचे संकट अजूनही संपलेले नाही.  कधीपर्यंत राहणार हे सांगता येत नाही.त्यामुळे या विषाणूच्या गडद छायेतच आपल्याला जगण्याची सवय करायची आहे. हा लढा कुण्या एकट्याचा नाही. त्यामुळे यापुढे सर्वांनी शासनाच्या दिशानिर्देशांचे पालन करीत एकत्रितपणे लढा देऊन कोरोनावर मात करूअसे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले.

नागपूर महानगरपालिका मुख्यालयात स्वातंत्र्यदिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ध्वजवंदनानंतर आयोजित कार्यक्रमात ते उपस्थितांना संबोधित करीत होते.     यावेळी मंचावर उपमहापौर मनीषा कोठेआयुक्त तुकाराम मुंढेविरोधी पक्ष नेते तानाजी वनवेअतिरिक्त आयुक्त जलज शर्माराम जोशीसंजय निपाने,  
नगरसेवक जितेंद्र घोडेस्वार उपस्थित होते. 
पुढे बोलताना महापौर संदीप जोशी म्हणालेनागपूर शहराच्या विकासात लोकसहभाग वाढावा या उद्देशातून अनेक उपक्रम राबविण्यात आले. यातून पुढे आलेल्या नागरिकांच्या सूचनांच्या आधारे विकासकामांचा आढावा तयार करण्यात आला. महापौर निधीतून शहरभरात सुलभ शौचालय उभारण्याचा संकल्प केला. मात्र याच काळात कोरोनाचे संकट समोर उभे राहिले आणि विकासकामांना ब्रेक लागला. जीव वाचविणे ही प्राथमिकता झाली. मनपाचे पदाधिकारीनगरसेवकअधिकारीकर्मचारीआरोग्य यंत्रणामेयोमेडिकलपोलिसजिल्हा प्रशासन यांनी या काळात केलेले आणि करीत असलेले कार्य इतिहासात नोंद व्हावे असेच आहेअसे म्हणत त्यांनी या सर्व योद्धांना मानाचा मुजरा केला.


तत्पूर्वी महापौर संदीप जोशी यांनी ध्वजारोहण केले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या परेडचे निरीक्षण केले. नेहरूनगर झोन सभापती समिता चकोलेसतरंजीपुरा झोन सभापती अभिरुची राजगिरे,, उपायुक्त निर्भय जैनसुभाष जयदेवडॉ. प्रदीप दासरवारअमोल चोरपगारसहायक आयुक्त महेश धामेचाअधीक्षक अभियंता मनोज तालेवारश्वेता बॅनर्जीनगररचना सहायक संचालक प्रमोद गावंडेवैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. योगेंद्र सवाईशिक्षणाधिकारी प्रीती मिश्रिकोटकरमुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांच्यासह सर्व झोन सहायक आयुक्तविभागप्रमुखकार्यकारी अभियंताअधिकारीकर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन एनएसएसडीसीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा उपायुक्त महेश मोरोणे यांनी केले. 

आशा वर्कर्सचे मानधन वाढावे
कोरोनाकाळातील कार्यात आशा वर्कर्सचे कार्य दखल घेण्याजोगे आहे. आरोग्य यंत्रणेच्या खांद्याला खांदा लावून तळागाळात जाऊनस्वतःचा जीव धोक्यात घालून अगदी तुटपुंज्या मानधनावर त्या आजही कार्य करीत आहे. त्यांचे मानधन डिसेंबर महिन्यापर्यंत एक हजार रुपयांनी वाढविण्याची सूचना त्यांनी केली. 

'कोरोना योद्धांचा सत्कार
गेल्या पाच महिन्यांपासून कोरोनाशी लढणाऱ्या योद्धांचा यावेळी महापौर संदीप जोशीउपमहापौर मनीषा कोठेआयुक्त तुकाराम मुंढे  विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सत्कार करण्यात आलेल्या योद्धांमध्ये डॉ. मिनाक्षी सिंगडॉ. स्वाती गुप्ताडॉ. विजय जोशीडॉ. बालाजी मंगमडॉ. शुभम मनगटेडॉ. सागर नायडूडॉ. मिनाक्षी मानेडॉ. नितीन गुल्हाने,  डॉ. दानिश इकबालडॉ. शीतल गोविंदवारडॉ. टिकेश बिसेनसुकेशिनी मूनजया कांबळेछाया मेश्रामअंकिता बरडेवर्षा चव्हाणसोहेल अलीराहुल निनावेईश्वर चहांदेआकाशचंद्र समुद्रेसंदीप बनसोडशेखर रामटेकेमहेंद्र वानखेडे यांचा समावेश आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.