प्रथम 11111 रु, द्वितीय 7777 रु, तृतीय 4444 रु, तसेच चतुर्थ 2222 रु, पारितोषिकांची मेजवानी
चंद्रपूर : कोरोना जनजागृती व पर्यावरण पूरक इकोफ्रेंडली घरगुती गणपती व सजावट स्पर्धेचे आयोजन चंद्रपुर शहर (जिल्हा ) कांग्रेस कमेटी तर्फे करण्यात आले आहे. सर्वांच्या लाडके गणपतीची बाप्पा च्या आगमनाच्या प्रित्यर्थ पर्यावरण पूरक बाप्पाच्या स्थापनेने जनजागृती एक सामाजिक संदेश देणारा उपक्रम चंद्रपूर शहर (जिल्हा) कांग्रेस कमेटी तर्फे करण्यात येत आहे.
यामध्ये स्पर्धक चंद्रपूर शहरातील राहील. स्पर्धकांनी आपल्या सजावटीचे व बाप्पाच्या मूर्तीचे फोटो खालील क्रमांकावर वॉट्सअप च्या माध्यमातून पाठवायचे आहेत. सजावटीमध्ये कोरोना जनजागृती व पर्यावरण पूरक सजावटीला प्राधान्य देण्यात येणार आहे. प्रमुख १५ स्पर्धकाकडे चमू जाऊन त्यातील पाच उत्कृष्ट सार्धकांना विजयी घोषित करेल. त्यामध्ये प्रथम 11111 रु, द्वितीय 7777 रु, तृतीय 4444 रु, तसेच चतुर्थ 2222 रु, पारितोषिकांची मेजवानी मिळणार आहे. या स्पर्धेतील स्पर्धकानी २६ ऑगस्ट २०२० पर्यंत फोटो खालील वॉट्सअप क्रमांकावर पाठवावेत. केतन 9970790037, शुभम 9021231661,वैभव 8180051173 स्वर्धेचे पुरस्कार २८ ऑगस्ट २०२० रोजी जाहीर करण्यात येणार आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त शहरातील स्पर्धकानी भाग घ्यावा असे आवाहन रितेश तिवारी, अध्यक्ष, चंद्रपूर शहर(जिल्हा) कांग्रेस कमेटी यांनी केले आहे.