शासनाने पानटपरी सुरु करण्यास परवानगी द्यावी
मागील पाच महिन्यापासून रेस्टराँट व पानटपरी चालकांनी आपला व्यवसाय बंद ठेवल्याने त्यांचे कंबरडे मोडले आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या रेस्टॉरंट व पानटपरी व्यव्सयिकांना हात देत रेस्टरेन्ट व पानटपरी सुरु करण्याची परवानगी देण्यात यावी. कोरोना संकटात रेस्टॉरंट मालकांनी कोरोना योद्धा म्हणून काम केले तसेच कोरोना मधे सर्वांनी लोकांना अन्नदान, आर्थिक कार्याला नेहमीच सहकार्य केले.
पाच महिन्यापासून त्यांचावार उपासमारीचि वेळ आली आहे. व्यवसाय बंद असल्याने दैनंदिन खर्च, मुलांचे शिक्षण, दवाखाना, घर भाडे, आदी सर्व बाबी विवंचना वाढविनारे आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे आता महाराष्ट्र शासनाने आता लॉ कडाऊन प्रक्रियेमधे अन्लॉक प्रक्रिया हळुहळु सुरु केलेली आहे. तसेच आता काही दुकाने सुद्धा हळुहळु सुरु झालेले आहे. त्या अनुशंगाने आपण रेस्टॉरंट मधे बैठक व पानटपरी सुरु करण्यास परवानगी द्यावी यासाठी सहकार्य करावे.
अशी विनंती **मा. उपायुक्त श्री. नर्भयजी जैन म.न.पा. व मा. जिल्हाधिकारी श्री. रविंद्रजी ठाकरे** यांना करण्यात आली तेव्हा **सिद्धू भाऊ कोमेजवार, आशिष देशमुख, राजेश वाघमारे, प्रविण देशमुख, दीपक पोहणेकर, अक्षय वाकडे, विनोद शाहू, कार्तिक नारनवरे, सुरेश कदम, शंकर बेल्खोडे, जितू गभने, मोहन शनेश्र्वर व इतर** शिवसैनिक उप्स्तीथ होते.