चंद्रपूर- मूल महामार्गावर लोहारा ह्या गावाजवळ दुर्मिळ रस्टी स्पॉटेड कॅट चा अज्ञात वाहनाच्या धडकेत अपघाती मृत्यू झाला असून ,पप्पी यादव यांना ह्या मार्गावरून घरी परत येत असतांना आढळली, हि मांजर रान-मांजरांपेक्षा वेगळी असल्याने पप्पी यादव त्यांनी वन्यजीव अभ्यासक दिनेश खाटे यांना मांजरीचे फोटो पाठवले व दिनेश खाटे यांनी रस्टी स्पॉटेड कॅट असल्याचे सांगितले व दोन वर्षाआधी ऊर्जानगर वसाहतीत सुद्धा रस्टी स्पॉटेड कॅट चा अपघाती मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले.
चंद्रपूर- मूल महामार्गावर कालच एका मोठ्या सांबर चा मूल जवळ मृत्यू झाला असून २४ तासाच्या आत हि दुसरी घटना घडली आहे , हा महामार्ग अनेक वन्यजीवांचा मृत्यू साठी कारणीभूत ठरत आहे, ह्या रस्त्यावरती वनविभागाद्वारे साईनबोर्ड लावण्यात आले असून, "कृपया वाहने हळू चालवा ", "वन्यप्राणी रस्ता ओलांडत आहे",असे लिहिले आहे, पण ह्या दुर्मिळ मांजराचा अपघात ह्याच साईनबोर्ड समोर झाला आहे, म्हणजे ह्या साईनबोर्ड चा शून्य उपयोग असल्याचे लक्षात येते.
हा महामार्ग ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्प लगतच असल्याने अनेक वाघांचे भ्रमण मार्ग सुद्धा आहे, हा कावल अभयारण्य -ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प- उमरेड-कऱ्हांडला अभयारण्य ला जोडणारा वाघांचा भ्रमण मार्ग म्हणून ओडखला जातो. रस्टी स्पॉटेड कॅट हि दुर्मिळ असलेली निशाचर प्राणी व परिशिष्ट १ मध्ये समावेश असलेला , आशिया खंडातील सर्वात लहान मांजर कुळातील रस्टी स्पॉटेड कॅट हि मांजर आहे , हि मांजर लहान असून रात्री तिची हालचाल जास्त असते, ह्या मांजराचे अस्तित्व भारतात व श्रीलंकेत सुद्धा आहे, हिची लांबी ३५ ते ४८सेंटिमीटर असते व वजन १.५ किलोपर्यंत असू शकते,रंग राखाडी भुरकट ,पाठीवरती करड्या रंगाच्या रेषा असतात ,आणि पोटावरती पांढऱ्या रंगाचे मोठे ठिपके असतात व शेपूट शरीराच्या अर्धी असते हि रस्टी स्पॉटेड कॅट ओळख आहे,पाणीगळती वनांमध्ये त्यांचे अस्तित्व दिसून येते व गवताळ भागात दाट, खडकाळ भागात जास्त असतात,ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्पात सुद्धा ह्या मांजरीचे अस्तित्व दिसून येते,समूहात न राहता एकट्याच दिसतात,झाडांवर व गुफेत त्या लपून बसतात.
ह्या मांजरीचे अधिवास दिवसेन दिवस नष्ट होत असल्याने त्यांचे अस्तिव धोक्यात आहे,कॅन्व्हेंशन ऑन इंटरनॅशनल इन इंडेन्जर्स जातीत परिशिष्ट १ मध्ये संरक्षण प्राप्त झालं असून ह्या प्राण्याची संरक्षणाची जबाबदारी हि आपली आहे दुर्दैवाने ह्या रस्टी स्पॉटेड कॅट हि मांजर अपघातात मृत्यू झाला आहे. वन्यजीवांचे अपघाती मृत्यू टाळण्यासाठी हा महामार्ग अनेक वन्यजीवांचा मृत्यू साठी कारणीभूत ठरत असल्याने चंद्रपूर- मूल महामार्गावर लवकरात लवकर वन्यजीवांसाठी अंडर पासेस बांधण्यात यावे हि मागणी पप्पी यादव यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे केली आहे.