कोरोना बाधित रुग्णांचा उपचार करत असताना कोरोनाची लागण झाल्याने मृत्यू झालेल्या सुनील टेकाम या ३२ वर्षीय युवा डॉक्टरला ‘शाहिद’ चा दर्जा देण्यात यावा तसेच त्यांच्या पत्नीला कायम स्वरूपी नौकरीत सामावून घेण्यात यावे अशी मागणी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली असून सदर मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना देण्यात आले आहे.
देशावर कोरोनाचे संकट असतांना डॉक्टर, पोलीस कर्मचारी, सफाई कर्मचारी जीवाची बाजी लाहून चोक कर्तव्य बजावत आहे. या कोरोना योद्धांमुळे कोरोनाच्या प्रादुर्भावावर प्रशासन नियंत्रण मिळविण्याचा प्रयन्त करत आहे. मात्र कोरोना रुग्णांची सेवा करत असतांना अनेक कोरोना योद्धांना आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान असाच प्रकार चंद्रपूरातही घडला असून कोरोना रुग्णांची सेवा करत असतांना ३२ वर्षीय डॉ. सुनील टेकाम यांचा मृत्यू झाला आहे. ते मागील सहा महिन्यापासून वरोरा उपजिल्हा रुग्णालयात कंत्राटी पद्धतीवर कोव्हीड सेंटरमध्ये कोरोना बाधित रुग्णांची सेवा करत होते.
या दरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाल्याने उपचाराकरीत चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महविद्यालयातील कोव्हीड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथे उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशहितात देशसेवा करत असताना मृत्यू झालेल्या डॉ. सुनील टेकाम यांना शहिदचा दर्जा देण्यात यावा तसेच त्यांच्या पत्नीला कायमस्वरूपी नौकरी देण्यात यावी अशी मागणी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे. सदर मागणी संदर्भात यंग चांदा ब्रिगेडच्या शिष्ट मंडळाने जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांची भेट घेतली असून त्यांना निवेदन दिले आहे. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे शहर संयोजक कलाकार मल्लारप, भोला मडावी, जितेश कुळमेथे, यंग चांदा ब्रिगेडच्या आदिवासी महिला विभाग प्रमुख वैशाली मेश्राम, वृषभ परचाके, राशीद हुसेन, आदींची उपस्थिती होती.