Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, ऑगस्ट ०६, २०२०

दुध भुकटी आदिवासी मुले, महिलांना मोफत देणार



            मुंबई दि 6: दुध भुकटी ही पॅकिंग करून अमृत आहार योजनेतील लाख 51 हजार मुलांना आणि लाख 21 हजार गरोदरस्तनदा मातांना मोफत देण्याचा निर्णय काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला
            या बैठकीस दुग्धविकास मंत्री सुनील केदारराज्यमंत्री दत्तात्रय भरणेत्याचप्रमाणे राज्यमंत्री बच्चू कडूमुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहतामुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंहमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगेदुग्धविकास प्रधान सचिव अनुप कुमारमहिला व बालकल्याण सचिव आय. ए. कुंदनआदिवासी विकास सचिव विनिता सिंघलमहानंदचे प्रतिनिधी हे देखील उपस्थित होते. ही योजना पुढे एक वर्ष राबविण्यात येणार असून 121 कोटी उत्पादन खर्च आला आहे. भुकटीचा प्रती किलो उत्पादन खर्च 246 रुपये 70 पैसे इतका आहे. 
            दुध भुकटीत प्रोटीनचे प्रमाण 34 टक्के आहे आणि या कोविड काळात पोषणासाठी ती उपयुक्त असल्याने मुलांना, स्तनदा व गरोदर मातांना त्याचा अधिक लाभ होईल यामुळे हा निर्णय घेण्यात आला. 
राज्य शासनाने लॉकडाऊन परिस्थितीत एप्रिल ते जुलै या कालवधीत 5 कोटी 94 लाख 73 हजार 606 लिटर दुध शेतकऱ्यांकडून घेतले. तर ४९२७.७०२ मेट्रिक टन दूध भुकटीचे उत्पादन केले. तसेच २५७५. १७१ मेट्रिक टन बटरचेही उत्पादन केले अशी माहिती बैठकीत देण्यात आली. ही भुकटी आणि बटर हे वखार महामंडळाच्या शीतगृहांमध्ये ठेवण्यात आले आहे.
            एकूण ७ दुध भुकटी प्रकल्पधारक आणि ३७ सहकारी संघ  आणि ११ शासकीय दुध योजना या योजनेत आहेत. महानंदने ही योजना राबविली. दुधाचा खरेदी दर हा २२ रुपये १० पैसे ते २७ रुपये प्रती लिटर असा होतात्यामुळे शेतकऱ्यांचे कमी नुकसान झाले.
            यावेळी मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारकडे दुध भुकटीच्या बाबतीत खासदारांमार्फत जोरदार पाठपुरावा करावा अशीही सुचना केली तसेच यासंदर्भात एक पत्रही केंद्राला पाठविण्यात येत आहे असे ते म्हणाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी दुध भुकटी मुलाना आणि मातांना पुरविण्याचे व्यवस्थित नियोजन करण्यास आणि यात कुठलीही अडचण येऊ न देण्याचे निर्देश दिले.  

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.